आमिर कुतुब: कधी साफसफाई कामगार, तर कधी पेपर टाकण्याची कामे; आज कमवतोय कोटींनी रुपये

0

जर यशाची उंची गाठायची असेल तर मनात जिद्द असायला हवी. मेहनत, चिकाटी या जोरावरच यशाचे शिखर आपल्याला गाठता येतो. मात्र अनेकदा छोट्या पदाची कामे करायला लोक कचरत असतात, मात्र ते काम करूनही तुम्ही यशस्वी होऊ शकतात, अशीच गोष्ट आहे आमिर कुतुब यांची.

आमिर कुतुब सध्या मल्टिनॅशनल डिजिटल फर्मचे मालक आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या कंपनीचे वर्षाचे टर्न ओव्हर १० कोटी रुपये इतके आहे. मात्र एकेकाळी ते विमानतळावर साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होते, मात्र त्यांच्या जिद्दीमुळे ते इतका मोठा व्यवसाय उभा करू शकले.

आमिर अलिगढ येथील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आले होते. आमिर यांनी १२ पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आमिरच्या वडिलांची इच्छा आमिरला डॉक्टर बनवण्याची होती. त्यामुळे वडिलांनी आमिरला १२ नंतर बिटेकला प्रवेश मिळवून दिला. मात्र यात आमिर यांचे बिलकुल मन लागत नव्हते.

आमिर यांच्या डोक्यात वेगळं काहीतरी करण्याचे विचार होते. त्यांना सोशल नेटवर्किंग ऍप बनवनायचे हहोते, त्यासाठी त्यांनी कोडिंग शिकायला सुरुवात केली. त्यानंतर आमिर यांनी सोशल नेटवर्किंग ऍप बनवली, त्यांना यात यश देखील मिळाले.

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी होंडा कंपनी जॉईन केली. या कंपनीत आमिरने काही बदल केले. त्यामुळे मॅन्युयल कामे बदलून कंपनीत ऑनलाइन कामे सुरू झाली. यामुळे कंपनीचे जीएम आमिर यांच्यावर खूप खुश झालेले होते. मात्र स्वतःचा व्यवसाय असावा या दृष्टीने काम करायचे आमिरच्या डोक्यात होते, त्यामुळे एका वर्षात त्यांनी होंडा कंपनीला रामराम ठोकला.

नवीन व्यवसाय म्हणून काय करावे असा विचार आमिर यांनी केला असता. त्यांना कोणताच व्यवसाय सोईस्कर नाही वाटला, त्यामुळे त्यांनी वेबसाईट डिझाईनचे फ्रीलांस काम सुरू केले. हे काम करताना त्यांना यूएस, युकेचे ग्राहक त्याला मिळत होते, यात अनेक लोकांनी त्यांना बाहेर देशात जाऊन आपला व्यवसाय सुरू करण्याचे सांगितले. याच सल्ल्यावरून आमिर विद्यार्थी विजावर ऑस्ट्रेलियाला गेले, आणि एमबीएला प्रवेश घेतला.

ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तिथे कॉलेजची फी जमा करणे आमिर यांच्यासाठी एक आव्हान झाले होते, त्यामुळे तिथे त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. चार महिने आमिर नोकरी शोधत होते, तिथे त्यांना जवळपास १७० कंपन्यांनी नकार दिला कारण त्यांना कामाचा अनुभव असलेले कर्मचारी हवे होते, तसेच भारताचा अनुभव ते ग्राह्य धरत नव्हते.

काम शोधत असताना शेवटी त्यांना ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावर साफसफाई कर्मचाऱ्याचे काम मिळाले. मात्र त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी रात्री ३ ते सकाळी ७ पेपर वाटण्याचे काम सुरू केले.

पेपर टाकण्याच्या कामाबद्दल आमिर यांच्या घरच्यांना कळले तेव्हा ते खूप नाराज झाले, त्यांनी आमिर यांना पुन्हा घरी येण्यास सांगितले. मात्र आमिर यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. अशात त्यांनी खूप मेहनत करून आपली कंपनी रजिस्टर केली. मात्र त्याच्या समोर एक आणखी आव्हान उभे होते, ते म्हणजे ग्राहकांचे.

आमिर यांनी कंपनी तर सुरू केली होती, मात्र त्यांच्याकडे ग्राहकच यायला तयार नव्हते. अशात त्यांना एक ग्राहक मिळाला, त्या ग्राहकाला आमिर यांनी एक असे सिस्टम बनवून दिले ज्यामुळे त्या ग्राहकाचे ५ हजार डॉलर वाचायला लागले, त्यामुळे तो आमिर यांच्यावर इतका खुश झाला की त्याने आमिरला फक्त पैसेच नाही दिले तर नवीन ग्राहकदेखील आणून दिले.

अशाप्रकारे आमिर यांचा व्यवसाय हळूहळू सेट होत गेला. आज चार देशांमध्ये आमिर यांची कंपनी ग्राहकांना सेवा देत आहे. इतकेच नाही तर आमिर यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर १० कोटी रुपये इतका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.