भाज्या विकून गावातल्या लोकांसाठी तयार केले रुग्णायल, आता मोफत करतेय उपचार

0

 

आजकाल जगात खुप कमी लोक असे असतात, जे स्वता:च्या कुटुंबासोबतच समजाचा विचार करत असतात. याच लोकांच्या यादीतले एक नाव म्हणजे सुभाषिनी मिस्त्री.

सुभाषिनी यांनी भाज्या विकून एक रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयात लोकांवर मोफत उपचार केले जातात. त्यांनी या रुग्णालयाचे नाव Humanity Hospital असे ठेवले आहे. या कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

सुभाषिनी यांचा जन्म १९४३ मध्ये झाला होता. ते सर्व मिळून कुटुंबात १४ भाऊ-बहिण होते. यामध्ये सात बहिण-भावांचा सततच्या दुष्काळाने मृत्यु झाला होता. त्यानंतर १४ वर्षे वय असतानाच सुभाषिनी यांचे लग्न झाले.

२३ वर्षाचे वय असताना ४ मुलांची आई बनली होती. एक दिवस त्यांच्या पतीची प्रकृती खुप खराब झाली. त्यावेळी गावात रुग्णायातल नव्हते, त्यामुळे त्यांना दुसऱ्या शहराच्या रुग्णालयात भरती करण्यात आले, पण परिस्थिती गरीब होती त्यामुळे पैशांच्या अभावामुळे त्यांना त्यांच्या पतीला वाचवता आले नाही.

या घटनेमुळे सुभाषिनी खुप दु:खी झाल्या होत्या.त्यांनी तेव्हाच एक निश्चय केला की आता यापुढे गावात कोणाचाही मृत्यु उपचाराअभावी होणार नाही. त्यांनी फक्त हा विचारच केला नाही, तर या कामासाठी तयारीही सुरु केली.

त्यांनी कुटुंबाला चालवण्यासोबतच रुग्णायल उभे करण्यासाठी पैसे जमवायला सुरुवात केली. १० हजार रुपये जमल्यानंतर त्यांनी रुग्णालयासाठी १ एकर जमीन खरेदी केली. १९९३ मध्ये त्यांनी एका ट्रस्टची सुरुवात केली, तर १९९५ मध्ये त्यांनी रुग्णालय उभे केले.

त्यांच्या या कामात गावातील लोकांनीही मदत केली होती. पण ही गोष्ट पुरेशी नव्हती कारण या रुग्णालयाचे बांधकाम अर्धवट होते. पावसाळ्यात डॉक्टरांना रस्त्यावर राहून रुग्णांचा उपचार करावा लागायचा.

त्यामुळे रुग्णायलाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी त्यांनी खासदारांची मदत घेतली. त्यानंतर तिथल्या आमदार, खासदार आणि स्थानिक लोकांनी मिळून या रुग्णालयाचे बांधकाम पुर्ण केले. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला पश्चिम बंगालचे राज्यपालही आले होते.

आज Humanity Hospital ट्रस्टकडे तीन एकर जमीन आहे. तसेच या कामासाठी आता देशातले अनेक मोठ्या वक्तींनी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. सुभाषिनी यांनी गावात रुग्णायल उभारल्यामुळे आता पर्यंत अनेक लोकांचे जीव वाचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.