ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन सुरू असतानाही नऊ वर्षाची सौम्या वाजवत होती पियानो; बघा हा व्हिडिओ…

0

मध्य प्रदेशात एक वेगळ्याच पद्धतीचे ऑपरेशन बघायला मिळाले आहे, हे ऑपरेशन एका नऊ वर्षीय मुलीवर करण्यात आले असुन ऑपरेशनच्या वेळेस ती मुलगी चक्क पियानो वाजवताना दिसून आली आहे.

शुक्रवारी त्या मुलीचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे. ग्वालियरच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये अभिषेक चव्हाण नावाच्या डॉक्टरांनी हे ऑपरेशन केले आहे. विशेष म्हणजे ऑपरेशनच्या वेळी मुलगी घाबरली नसून ती पियानो वाजवत होती.

या नऊ वर्षाच्या मुलीचे नाव सौम्या असे आहे. ती मुरैना जिल्ह्याच्या बानमोर गावात राहते. गेल्या दोन वर्षांपासून तिला फिट येत होती. त्यासाठी ती उपचार घेत होती पण त्याचा फायदा तिला होत नव्हता.

एक वर्षांपुर्वी तिला ब्रेन ट्युमर असल्याचे कुटुंबाला समजले होते. त्यासाठी ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन करणे गरजेचे होते, मात्र तिच्या कुटुंबातील सदस्य हे ऑपरेशन करण्यास तयार नव्हते, कारण या ऑपरेशनमध्ये जोखिम होती.

ऑपरेशन खुप कठिण होते, त्यामुळे ऑपरेशनमध्ये कोणती चुक झाल्यास मुलगी आयुष्यभरासाठी अपंग होण्याची शक्यता होती, या कारणांमुळेच कुटुबातील सदस्य ऑपरेशन करण्यासाठी पुढाकार घेत नव्हते.

जेव्हा कुटुंबाने पुन्हा एकदा सौम्याची तपासणी केली, तेव्हा असे लक्षात आले की, ट्युसरचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पहिल्यापेक्षा चारपटीने हा आकार वाढलेला होता. त्यामुळे लवकरात लवकर हे ऑपरेशन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

कुटुंबाला हे ऑपरेशन कुठल्यातरी मोठ्या शहरात करायचे होते, पण मोठ्या शहरात ऑपरेशनचा खर्च तीनपट जास्त होता त्यामुळे हे ऑपरेशन त्यांनी ग्वालियारमध्येच करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच तिचे ऑपरेशन करण्यात आले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुर्ण जगभरात इतक्या कमी वयाच्या रुग्णासोबत हे ऑपरेशन केल्याचे दुसरेच प्रकरण आहे. हे ऑपरेशन खुप कठिण असते. कधी कधी ट्युमर डोक्याच्या त्या भागाच्या जवळ असतो, ज्या भागातुन आपले अवयव नियंत्रित केल्याचे काम होते. जर ऑपरेशनमध्ये कुठली चुक झाली, तर रुग्णाला आयुष्यभराचे अपंगत्व येण्याची शक्यता असते.

ऑपरेशनचे नाव ऐकुण मोठमोठ्या लोकांना घाम फुटतो, पण ऑपरेशन सुरु असताना सौम्या चक्क पियानो वाजवत होती. सौम्याचे हे साहस बघून देशभरात तिचे कौतुक केले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.