हृतिकचा ‘हा’ चित्रपट हिट झाल्यानंतर त्याच्या वडिलांवर अबू सालेमने झाडल्या होत्या सहा गोळ्या कारण…

0

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनचा आज ४७ वा वाढदिवस आहे. १० जानेवारी १९७४ मध्ये त्याचा जन्म झाला होता. गेल्या २० वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रित काम करत असून गेल्या २० वर्षा त्याने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका निभावल्या आहे.

हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट राकेश रोशन यांनीच बनवला होता. हृतिकचा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. आज जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल…

राकेश रोशन यांची या चित्रपटासाठी पहिली चॉईस शाहरुख खान होती. पण तेव्हा शाहरुख खान कामात असल्याने त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

तेव्हा हृतिकने हा चित्रपट एका न्युकमरला दिला पाहिजे असे आपल्या वडिलांना सांगितले. तेव्हाच या चित्रपटात राकेश रोशन यांनी हृतिकला या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला होता.

हिरो फायनल झाल्यानंतर राकेश रोशन यांनी हिरोईन म्हणून करिना कपूरला सिलेक्ट केले होते. पण काही कारणामुळे तिने हा चित्रपट साईन नाही केला.

त्यानंतर हा चित्रपटासाठी राकेश रोशन यांनी त्यांच्या मित्राची मुलगी अमिषा हिला घेण्याचा निर्णय घेतला. अमिषा नुकतीच परदेशातून इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून इकॉनॉमिक्सचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तिने या चित्रपटात करण्यास लगेच होकार दिला.

हृतिकचा या चित्रपटात डबल रोल होता. एक रोहित आणि एक राज. राजची भुमिका फिट मुलाची असल्याने त्याला फिजिरल ट्रेनिंगसाठी सलमान खानची मदत घेतली होती. त्यासाठी सलमान खानने त्याला आपल्या पर्सनल जिमची चावी देऊन ठेवली होती.

जेव्हा राकेश रोशन यांनी या चित्रपटाचे अनाऊंसमेंट केली होती. तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेम यांनी राकेश रोशन यांना फोन केला होता, त्याने राकेश रोशन यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पण या फोनकडे राकेश रोशन यांनी दुर्लक्ष केले होते.

२ महिन्यानंतर राकेश रोशन यांना पुन्हा फोन आला, तेव्हा अबू सालेम यांनी पैसे द्या किंवा चित्रपटाचे ओव्हर सीज डिस्ट्रिब्युशन राइट्स द्या अशी मागणी केली होती. या मागणीला पण राकेश रोशन यांनी दुर्लक्ष केले.

त्यानंतर चित्रपट रिलिज झाल्यानंतर एका आठवड्याच्या आतच राकेश रोशन यांच्यावर अटॅक झाला होता. राकेश रोशन यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यातल्या २ गोळ्या राकेश रोशन यांना २ गोळ्या लागल्या होत्या.

त्यावेळी राकेश रोशन यांच्या ड्रायव्हरची हुशारीमुळेच त्यांचा जीव वाचला होता. वेळ न घालवता ड्रायव्हरने त्यांची गाडी हॉस्पिटलकडे नेली होती, त्यामुळेच राकेश रोशन यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.