भारताच्या या तरुणाला मिळाला ‘यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार

0

जगाच्या पाठीवर अनेक भारतीय नागरिकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आता भारताच्या एका तरुणाला आपल्या  नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे आणि पर्यावरणाबाबतच्या विचारांमुळे त्याला ‘यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ’ असा पुरस्कार मिळाला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने (यूएनईपी) ‘यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर केले आहे. हा पुरस्कार जगातल्या सात जणांना देण्यात येणार आहे.

या सात जणांमध्ये भारताचा २९ वर्षीय तरुण विद्युत मोहनचे नाव आहे. विद्युत मोहन हा एक अभियंता आहे. त्याच्या नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठीच्या वेगवेगळ्या कल्पनांमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

विद्युत मोहन ‘टेकाचार’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहे. ते नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी करण्याच्या विचारात असतात. त्यासाठी शेतातील काडीकचरा जो असेल, तो जाळण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून इंधन बनवण्यासाठी ते शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असतात.

२०१८ मध्ये विद्युत मोहन यांनी टेकाचार या संस्थेची स्थापन केली होती. आतापर्यंत मोहन यांनी ४५ हजार शेतकऱ्यांना भेटी दिल्या असून ३ हजार टनपेक्षा जास्त काडीकचऱ्यांवर प्रक्रिया केलेली आहे.

त्यांनी हे उपकरण असे तयार केले आहे की, जे उपकरण कुठेही हलवता येते, तसेच ते कमी किमतीचे असून त्याचा आकार पण कमी आहे. त्याचा वापर करून शेतकरी काडी कचऱ्याचे रूपांतर इंधनात करू शकतात.उपकरणाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे ४० टक्के उत्पन्न वाढते.

तसेच विद्युत मोहन यांनी ऍक्टिव्हेटेड कार्बनची निवड करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मूल्यसाखळी आणली असून हवाप्रदूषण कमी करण्यात पण त्यांनी हातभार लावला आहे, असे यूएनईपीने म्हटले आहे.

तसेच २०३० पर्यंत टेकाचार ही संस्था ३० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार असून ४०० कोटी डॉलरचे उपन्न शेतकऱ्यांना मिळवून देणारा असल्याचेही यूएनईपीने म्हटले आहे.

विद्युत मोहन पहिल्यापासूनच शेतकऱ्यांना आणि गरिबांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. कोरोनाच्या संकटात पण शेतकऱ्यांसाठी विद्युत मोहन वेगवेगळ्या कल्पना मांडताना दिसून येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.