भाऊचा नाद नाय! भारतीय ‘चायवाल्या’ने अंतराळात पाठवला समोसा; व्हिडीओ व्हायरल

0

अंतराळाबाबत नेहमीच वेगवेगळे संशोधन केले जाते. तसेच अंतराळमध्ये नेहमीच प्राणी, वस्तू अशा विविध गोष्टी पाठवल्या जातात. त्यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी हे या गोष्टी पाठवल्या जात असतात.

आता या गोष्टीत भारतीय पण काही कमी नाहीये. ब्रिटनमधल्या एका भारतीयाने चक्क एक समोसा अंतराळमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. हा समोसा अंतराळात तर नाही जाऊ शकला पण फ्रांसमध्ये हा समोसा गेला आहे.

हा प्रयोग करणाऱ्या तरुणाचे नाव नीरज गधेर असे आहे. ब्रिटनमध्ये चायवाला नावाने नीरजचे एक रेस्टॉरंट आहे. त्याने एक दिवशी मस्करीत म्हटले होते की, मी अंतराळात समोसा पाठवणार आहे.

त्यानंतर नीरजने ही गोष्ट मनावरच घेतली. त्याने समोसा अंतराळात पाठवण्यासाठी हिलीयमच्या फुग्याचा वापर केला. या फुग्याला अंतराळात पाठवण्यासाठी त्याने तीन वेळा प्रयत्न केले.

पहिल्यांदा नीरजच्या हातामधून फुगा सुटून गेला होता. दुसऱ्यांदा फुग्यात गरजे इतका हिलीयम नव्हता त्यामुळे त्याचा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला. तिसऱ्यांदा हा फुगा खूप उंचीवर गेला.

तेव्हा असे लक्षात आले की, या फुग्यातला समोसा फ्रांसमध्ये जाऊन पडला आहे. नीरजने या फुग्याला गोप्रो कॅमेरा आणि गिपीएस ट्रॅकर सुद्धा लावलेले होते, त्यामुळेच समोसा कुठे गेला याची माहिती त्याला मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.