नोकरी सोडून सुरू केला पोल्ट्रीफार्म अन् २ महिन्यात कमवले अडीच लाख

0

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकजण व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता माढाच्या दाम्पत्याने तर नोकरी सोडून पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय सुरु केला आणि हा व्यवसाय करुन ते आता महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

माढातील केवड गावच्या या दाम्पत्याचे नाव भुषण शिरसट आणि स्वप्ना शिरसट आहे. पुण्यातील नोकरी सोडून या दाम्पत्याने पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय सुरु केला आहे. विशेष म्हणजे त्यांना काही दिवसातच या व्यवसात यश मिळाले आहे.

भुषण आणि स्वप्ना हे दोघेही पुण्याच्या सिव्हील इंजिनियर कंपनीत नोकरी करत होते. कोरोना काळात दोघांनीही नोकरी सोडून दिली आणि गावी परतून पोल्ट्रीचा व्यवसाय सुरु केला.

त्यांनी कोंबड्याच्या पालनाचे आणि विक्रीचे योग्य नियोजन केले आहे. त्यांच्या या नियोजनाचा त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मागील २ महिन्यात त्यांनी २ लाख ५४ लाख रुपये कमवले आहे.

भुषण आणि स्वप्ना यांचे लग्न झाल्यानंतर त्या दोघांनी पुण्यातील कंपनी जॉईन केली होती.  नोकरीतून त्यांना महिन्याला १ लाख रुपये मिळायचे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि त्यामुळे ते दोघेही घरी परतले.

गावी परतल्याने त्यांनी गावातच आपला काहीतरी व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांनी कायमची नोकरी सोडली आणि पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय सुरु केला आहे.

सुरुवातीला त्यांनी आपल्या अंगणात २०० कोंबड्या पाळण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी एक एकराच्या शेतीत पत्र्याचे शेड उभारले आणि ३ हजार देशी कोंबड्या आणल्या. ६५ दिवसांत त्यांना ४ लाख ६५ खर्च आला. खर्च वजा करता २ लाख ५४ हजार त्यांना नफा मिळाला आहे.

व्यवसाय करताना तुमच्या जिद्दीला मेहनत आणि कल्पकतेची जोड असेल, तर शेतीच्या जोडधंद्यातून पण चांगले उत्पन्न मिळते हे या दाम्पत्याने दाखवून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.