पोरगी MPSC होऊन अधिकारी झाली; पण अधिकारी होऊन मिळणार नाही एवढा पैसा शेतीत कमावला..

0

 

अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेत असतात, एखादी पदवी मिळवत असतात आणि त्यानंतर नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. मात्र जर दहावी, बारावी बोर्डात आणि राज्यात उत्तम गुण मिळवणारं कोणी जर शेती करतेय तर तुमचा यावर नक्कीच विश्वास बसणार नाही.

एवढेच नाही तर अनेक तरुण तरुणी वर्षानुवर्षे एमपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करता असतात,  ते यशही मिळवलेली पुण्यातील विद्यार्थीनी आज कोकणातील दुर्गम भागात शेती करतेय अस म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अशी एक महिला शेतकरी आहे. या महिलेचे नाव पूर्वश्रमीचे सुवर्णा गोडबोले (Suvarna Godbole) आणि आजचे सुवर्णा वैद्य (Suvarna Vaidya) असे आहे. सुवर्णाचे या सर्वार्थाने पुणेकर असून गेल्या १५ वर्षांपासून रत्नागिरीमध्ये शेती करत आहे.

सुवर्णा या मूळच्या पुणेकर आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले. राज्यातही आपले नाव कमावले. एवढेच नाही तरुण तरुणी जी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची स्वप्न पहात असतात. ती परीक्षाही सुवर्णा उत्तीर्ण झाल्या आहे.

त्यानंतर सुवर्णा यांनी लग्न केले त्यानंतर त्या कोकणात स्थायिक झाल्या. एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या हातात हात घालून त्याही शेती करण्यासाठी शेतात रमू लागल्या. एखाद्या चित्रपटाला साजेल अशी ही सुवर्णा यांची ही कथा आहे.

सुवर्णा या गेल्या पंधरा वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यातील रीळ या गावात शेती करत आहे. शेतीत त्या भातशेती, भाजीपाला लागवडीसह आंबा उत्पादनात रमल्या आहे. एवढेच नाही तर सुवर्णा या शेतीत नवनवे प्रयोग करून ४० ते ४५ कुटुंबांची पोट भरण्याचेही काम सुवर्णा करतात.

एखादी विद्यार्थीनी बोर्डात चांगले गुण मिळवणारी, राज्यात नाव कमावणारी आणि एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणारी शेती व्यवसाय का करतेय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, त्यामागची गोष्टही तेवढीच इंटरेस्टिंग आहे.

सुवर्णा या मूळ पुण्यात राहणाऱ्या. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी त्या आपल्या मैत्रिणीच्या गावी म्हणजेच कोकणातील रीळ या गावी आल्या होत्या. त्यावेळी सुवर्णा यांच्या मैत्रिणीने सुवर्णाला मिलिंद वैद्य नावाच्या होतकरू शेतकऱ्याशी ओळख करून दिली.

मिलिंद यांची परिस्थिती बेताची होती. रोज १० किलोमीटर पायपीट करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते, मात्र त्यांचा कल शेतीकडे होता. त्यांना शेतात नवनवे प्रयोग करायला आवडायचे या सर्व गोष्टी सुवर्णा यांना थक्क करून गेल्या. त्यानंतर सुवर्णा या पून्हा पुण्याला आल्या मात्र त्यांच्या डोक्यात ग्रामीण भागातील परिस्थितीचे चक्र सुरूच होते.

अखेर सुवर्णा यांना मिलिंद यांचे लग्नासाठी स्थळ सुचवले गेले. घरच्यांसोबत ते देखील या लग्नासाठी तयार नव्हत्या. मात्र मिलिंद हे होतकरू आणि प्रामाणिक असल्याने सुवर्णा यांनी एका भेटीत मिलिंद यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला.

सुरवातीला सुवर्णा यांना गावात राहण्यात अडचणी येत होत्या, कारण हव्या तशा सुखसुविधा गावात उपलब्ध नव्हत्या. मात्र त्यानंतर हळूहळू सुवर्णा यांचे गावात मन रमू लागले.

शेतीत काम करून राबणे, त्या कष्टातुनकाही सर्वकाही उभं करणे. यात वेगळे समाधान असल्याचे सुवर्णा म्हणतात. तसेच रत्नागिरीत आल्यानंतर शेतीतून त्या अनेक गोष्टी शिकल्या आहे, असे सुवर्णा म्हणतात.

मिलिंद आणि सुवर्णा यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहे. त्यांना एक मुलगा आहे, तो सध्या नववीत शिकत आहे. सुवर्णा आणि मिलिंद हे नेहमीच शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. मिलिंद हे लेक्चरर म्हणून अनेक ठिकाणी भेटी देत असतात. परिसरात तर त्यांची शेतीचे विद्यापीठ म्हणून ओळख आहे. इतकेच नाही तर वर्षाकाठी ते शेतीतून लाखोंची उलाढालदेखील करत असतात.

या दोघांमुळे जवळपास ४५ कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्या कुटुंबांना चांगला मोबदला देखील मिळत असतो. काही लोक तर इथं महिना पगारावर देखील काम करतात. सर्वजण मजूर म्हणून नाही तर आपली शेती म्हणून काम करताना दिसून येतात.

शेतकरी म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. आकाशाकडे बघणार, भेगा पडलेल्या जमिनिकडे बघणारा, असे निराशावादी चित्र आपल्याला दिसते. पण शेती ही खूप व्यापक आहे. सध्या त्यातील नियोजन त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे सर्व मला अनुभवता येत आहे, याचा मला अभिमान आहे, असे सुवर्णा सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.