कोरोनाच्या संकटात ‘या’ मुलीने मिळवले ४६ लाखांचे पॅकेज; जाणून घ्या कसं…

0
  • कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्या बंद पडल्या आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. अशात गुजरातच्या एका तरुणीने  बंगळुरूच्या एका कंपनीत नोकरी मिळवून वर्षाला ४६.२७ लाखांचे तगडे पॅकेज मिळवले आहे.

गुजरातच्या निरमा विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचे नाव सुलभा गर्ग आहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बिटेकच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुलभाने बंगळुरूच्या एका आयटी कंपनीत नोकरी मिळवली आहे.

सुलभा निरमा युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग (बिटेक) विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. ती जानेवारीपासूनच इंटर्नशिप सुरू करत आहे, तर पुढच्या वर्षांपासून ती आयटी डेव्हलपर म्हणून जॉईन करणार आहे.

सुलभाची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पडली होती. सर्वात आधी तिची ऑनलाइन टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर ती तांत्रिक फेऱ्यांना सामोरे गेली. पूढे तिने कल्चर फिटची फेरी दिली त्यानंतर तिला ही नोकरी मिळाली आहे.

कल्चर फिट फेरी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कल्चर फिट म्हणजे विद्यार्थ्याची मुलाखत. कल्चर फिटमध्ये कंपनीचे टॉप मॅनेजमेंटचे अधिकारी विद्यार्थ्यांची मुलाखत होते. सुलभाने ही फेरी उत्तमरीत्या पार केल्याने तिला लगेच नोकरी मिळाली.

मी ही नोकरी मिळवण्यासाठी खूप आधीपासून तयारी करत होते. मला इतक्या चांगल्या पॅकेजची आधीपासूनच अपेक्षा होती, असे सुलभाने म्हटले आहे. सुलभाला मिळालेले पॅकेज तिच्या बॅचमधले सर्वात मोठे पॅकेज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.