इच्छाशक्तीला सलाम! अपघातात हातपाय गमावले, आता चिमुरडा काढतोय तोंडाने चित्र

0

प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपले ध्येय गाठणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला एक नऊ वर्षाच्या चिमुरड्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याची इच्छाशक्ती आणि जिद्द तुम्हाला पण आश्चर्य वाटेल.

तेलंगणा राज्यातील नऊ वर्षाच्या मधू कुमारने एका अपघातात हातपाय गमावले आहे. तरी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मधू आपल्या तोंडाने अप्रतिम चित्र काढत आहे.

आपल्या अप्रतिम आणि आकर्षक चित्रांमुळे मधू अनेक मोठमोठ्या सेलेब्रिटींचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच त्याने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचे चित्र काढले होते. त्याचा चित्र काढण्याचा व्हिडीओ सोनू सुदनेदेखील शेअर केला आहे.

मधू मुनपल्लेमंडलच्या कामकोले या गावात राहतो. तो १५ सप्टेंबर २०१९ मध्ये आपल्या घराच्या गच्चीवर खेळत होता. त्यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या लोखंडी रॉडचा संपर्क एका विजेच्या ताराशी आला होता. या अपघातात त्याला आपले हातपाय गमवावे लागले होते.

मधूचे वडील पंचरची दुकान चालवतात. त्यांना आणखी तीन मुले आहे. मधूच्या अपघातामुळे त्याच्या वडिलांना आणि त्याच्या आईला मानसिक धक्का बसला होता, असे मधूच्या वडिलांनी सांगितले आहे.

कलाकार डॉ. समुद्राला हर्ष यांनी मधूला तोंडाने चित्र काढण्याची ट्रेनिंग दिली आहे. माझ्या मते त्याने आपले हातपाय गमावले आहे, पण त्याच्याकडे त्याची चित्र काढण्याची कला अजून आहे. त्यामुळे मी त्याला तोंडाने चित्र काढण्याची ट्रेनिंग दिली असल्याचे हर्ष यांनी म्हटले आहे.

मी सहावीच्या वर्गाला शिकतो. मी आनंदी आहे कारण, १ वर्षापूर्वी माझा अपघात झाला आणि इतक्या लवकर मी तो विसरून पुन्हा चित्रकला शिकलो, असे मधू कुमारने म्हटले आहे.

हातपाय नसताना इच्छाशक्ती आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर मधू कुमार अप्रतिम चित्र काढत आहे. त्याची ही गोष्ट अनेकांना प्रेरणादेणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.