तरूण शेतकऱ्याने शेतात मोती पिकवत कमावला तुफान पैसा; मोदींनीही केले कौतुक

0

 

आज अनेक तरुण तरुणी शेती व्यवसायाकडे वळत आहे. शेतीत अनेक नवनवीन प्रयोग करून भरघोस उपन्न मिळवत आहे. उत्तर प्रदेशामध्ये वाराणसी जिल्ह्यातील नारायणपूर गावात एका शेतकऱ्याने मोतीची शेती केली आहे. विशेष म्हणजे यात त्याला यश मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याचे कौतुक केले आहे.

वाराणसीतील या शेतकऱ्याचे नाव श्वेतांक पाठक असे आहे. त्याने पारंपारिक शेती न करता मोतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समाजात श्वेतांक यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. इतकेच काय तर श्वेतांकमुळे इतर लोकांना रोजगारही मिळाला आहे.

श्वेतांक यांना मोतीची शेती करण्याची प्रेरणा एका ग्राम समितीच्या माध्यमातून मिळाली. पुढे त्यांनी इंटरनेटचा वापर करून या शेतीबद्दल माहिती काढली. त्यानंतर  त्यांनी समितीच्या मदतीने मोतीची शेती करण्यास सुरुवात केली.

ग्राम समितीच्या मार्गदर्शनाखाली श्वेतांक यांच्या घराच्या बाजूला एक तळे तयार करण्यात आले. त्या तळ्यात शेतीतून आणलेले ऑयस्टर ठेवले जाते. जुना तलाव असणाऱ्या ठिकाणीही ऑयस्टर ठेवले असता त्यापाण्यात ऑयस्टरची वाढ चांगली होते.

साधारणतः तीन प्रकारचे मोती असतात. पाहिले म्हणजे कृत्रिम मोदी, दुसरे नैसर्गिक मोती जे की समुद्रात तयार होतात. आणि तिसरे म्हणजे कल्चर्ड मोती. श्वेतांक हे कल्चर्ड मोतीची शेती करतात.

श्वेतांक यांनी कल्चर्ड मोत्यांची लागवड केली आहे. हे मोती पूर्णपणे तयार होण्यासाठी बारा ते तेरा महिने लागतात. पुढे त्यांना पॉलिश करून बाजारात पाठवले जाते. विशेष म्हणजे या प्रकारात मोतींना आपल्या मतानुसार आकार देता येतो.

मोतीची शेती करण्यासाठी श्वेतांक यांनी ओडिशातील संस्थेत विशेष प्रशिक्षण घेतले आहे. मोतीची शेती करण्यासाठी सुरुवातील शिप नावाची पावडर बनवली जाते. त्यापासून  केंद्रक बनले आहे. जे मोत्यांना कव्हर म्हणून ठेवले जाते. काही काळानंतर त्यांना जहाजाचा आकार येतो आणि त्यात मोती तयार होतो.

मोतीच्या या शेतीपासून चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे याला खर्चही कमी लागतो. मोतीची शेतीसाठी १० बाय १२ ची जमीन पुरेशी असते. सुरुवातीला मोतीची लागवड करण्यासाठी ५० हजार रुपये इतका खर्च येतो. तसेच यासाठी तुम्हाला शिंपल्यांची चांगली ओळख असणे गरजेचे आहे. श्वेतांक यांनी केलेल्या मोतीतुन त्यांना चांगला नफा मिळतो. श्वेतांक यांच्या एका मोतीची किंमत बाजारात ९० ते २०० रुपये इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.