‘पावर’ बोलून शक्तीमानला सळो की पळो करून सोडणारे विलेन डॉ. जैकाल सध्या काय करतात?

0

९० च्या दशकात एक टीव्ही सीरियल ‘शक्तीमान’ ही केवळ मुलांचीच नव्हे तर ज्येष्ठांचीही आवडती मालिका बनली. शक्तीमानला भारताचा पहिला सुपरहिरो मानले जाते. ५२० भागांच्या या मालिकेबद्दल असे म्हणतात की त्या काळात या मालिकेची टीआरपी इतकी जास्त होती की आजच्या काळातील मालिकासुद्धा या मालिकेला तोड देऊ शकत नाही.

आजच्या काळातही अनेक लहान मुले शक्तीमान मालिका बघतात. मोठ्यांनाही ही मालिका खुप प्रिय आहे. जर तुम्हालाही ही मालिका पाहायची असेल तर आजही युट्यूबवर ही मालिका उपलब्ध आहे. या मालिकेमध्ये प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनय केला होता. त्यातल्या त्यात या मालिकेत जे खलनायक दाखवण्यात आले होते त्यांनीही प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडली होती.

या सीरियलमध्ये बऱ्याच व्हिलन्सने शक्तीमानला त्रास दिला होता. त्यामध्ये एक व्हिलन होते ज्यांना शेवटपर्यंत दाखवण्यात आले त्यांचे नाव होते डॉ. जैकाल. त्यांना कधीपण तोंड उघडले की त्यांच्या तोंडून एकच शब्द वारंवार निघायचा तो म्हणजे पावर.

आज बरीच वर्षानंतर शक्तीमान टीव्हीवरून हरवला आहे पण तरीही त्याने लोकांच्या मनात घर केले आहे. डॉ. जैकलची भूमिका साकारणारे ललित परिमू यांना हैदर या चित्रपटात प्रेक्षकांनी शेवटचे पाहिले होते. चला आजकाल डॉ जैकल कुठे आहेत आणि काय काम करतात हे आपण जाणून घेऊया. पावर हा शब्द ज्या पावरने डॉ. जैकाल बोलायचे त्या पद्धतीने कोणालाही त्यांची जागा घेता येणार नाही.

शक्तीमानमध्ये तमराज किलवीशनंतर जर सगळ्यात मोठा कोणता व्हिलन असेल तर ते डॉ. जैकल होता. सीरियलमध्ये तो ‘ग्रेट सैतान सायंटिस्ट’ होता. जो शक्तिमानचा सर्वात मोठा शत्रू आणि भुतांचा प्रमुख तमाराज किलविशसाठी काम करणारा डॉक्टर होता. डॉक्टर जैकलने आपल्या शैतानी आयडियाने अनेक खलनायकांना जन्म दिला होता.

१९९७ मध्ये शक्तीमान सुरू झाल्यानंतरच ललितचे यांचे भाग्य बदलले होते. ते एकामागून एक चित्रपटांत भूमिका साकारत गेले. हजार चौरासी की मां, हम तुम पर मरते हैं, एजेंट विनोद और त्यानंतर २०१३ मध्ये हैदरमध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने अनेकांनी त्यांची खुप प्रशंसा केली होती.

ललित परिमू यांनी ‘मै मनुष्य हुं’ हे पुस्तक लिहिले आहे. याशिवाय ते लेखन क्षेत्राशीही संबंधित आहेत. थिएटरमध्ये काम करणारे ललित परिमू आणि १०० हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडणारे ललित परमू आता अ‍ॅक्टिंग अ‍ॅकॅडमी चालवतात. त्यांच्या या ऍकेडमीमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व लोक अभिनय शिकायला येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.