कडक सॅल्युट! आईचे उपाचाराअभावी निधन झाल्यामुळे ‘या’ माणसाने कोविड रुग्णालय केले उभे

0

कोरोनाच्या संकटाने अनेक लोकांचे जीवन उध्वस्त केले आहे. अनेक लोकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहे. तसेच अनेक सामान्य नागरिक कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले आहे.

आजची ही गोष्ट एका अशा माणसाची आहे ज्याने आपल्या दुःखातून सावरून दुसऱ्या लोकांवर तीच परिस्थिती येऊ नये म्हणुन लोकांना मदत केली आहे. या माणसाचे नाव शकील पिरजादे असे आहे. ते मिरजमध्ये राहतात.

कोरोना झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने शकील पिरजादे यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे शकील यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला होता. पण उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी त्यांनी मिरजमध्ये कोविड सेंटर उभारले आहे.

माझ्या आईला जेव्हा कोरोना झाला तेव्हा आम्ही अनेक रुग्णालयात गेलो. कुठे बेड मिळाले नाही तर कुठे ऑक्सिजनची सोय नव्हती, त्यामुळे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावे लागले अखेर तिथे आम्हला बेड मिळाली.

त्या रुग्णलायत ९ दिवस उपचार करण्यात आले, पण अखेर आईची प्राणज्योत मावळली, तिथे आम्हाला खूप वाईट वाटले, त्यामुळे गोरगरिबांना मदत व्हावी त्यांचे हाल होऊ नये, यासाठी कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला, असे शकील यांनी सांगितले आहे.

शकील यांच्या या कोविड सेंटरमध्ये ४० बेड आहेत. अनेकदा रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते. त्यामुळे त्यांनी सर्व बेडला ऑक्सिजनच्या सुविधा पुरवल्या आहे. कोरोनाच्या संकट काळात अनेक रुग्णांना या कोविड सेंटरची मदत झाली आहे.

या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना फक्त उपचारच दिले जात नाही तर त्यासोबत त्यांना मानसिक आधार देखील दिला जातो. त्यासाठी रुग्णांना आपल्या नातेवाईकांना बघता येईल आणि त्यांना मानसिक आधार भेटेल अशी सोय देखील त्यांनी केली आहे.

दुसऱ्या रुग्णलयात आधी रुग्णांकडून पैसे घेतले जातात. पण या रुग्णालयात आधी उपचाराला प्राधान्य दिले जाते, असेही शकील यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संकटात या कोविड रुग्णालयामुळे अनेक लोकांचे जीव वाचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.