कोण आहेत ‘सॅटेलाईट मॅन ऑफ इंडिया’, ज्यांच्यासाठी गुगलने बनवले आहे खास डूडल

0

 

 

जर तुम्ही आज सकाळी तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल सुरु केले असेल, तर तिथे तुम्हाला एक खास डूडल दिसले असेल. हे डूडल गुगलने भारतीय वैज्ञानिक प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त ठेवले आहे, पण तुम्हाला माहितीये का रामचंद्र राव कोण आहेत? चला तर मग जाणून घेऊया…

भारताच्या सॅटेलाईट प्रोग्रामला एक वेगळी दिशा देण्याचे काम रामचंद्र राव यांनी केले होते. त्यामुळे त्यांना सॅटेलाईट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते.

१९७५ मध्ये भारताने रामचंद्र राव यांच्या नेतृत्वाखालीच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात पाठवण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. भारतीय अवकाश विज्ञान जर आज इतक्या उंचीवर पोहचले आहे, तर त्यामध्ये रामचंद्र राव यांचे मोठे योगदान आहे.

रामचंद्र राव यांचा जन्म १० मार्च १९३२ मध्ये झाला होता. ते कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्याच्या अडामारु गावात राहायचे. सामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या रामचंद्र राव यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर भारताच्या सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांमध्ये नाव पोहचवले आहे.

रामचंद्र राव यांनी भारतीय अनुसंधान संस्थान म्हणजेच इस्त्रो या संस्थेचे ते अध्यक्ष होते, तसेच रामचंद्र राव भारताचे अवकाश सचिवपदी कार्यरत होते.

प्रोफेसर रामचंद्र यांनी भारतीय अवकाश विज्ञानाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा पोहचवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने १९७५ मध्ये पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्ट ते २० पेक्षाजास्त सॅटेलाईटचे डिझाईन तयार केले आहे.

२०१३ मध्ये सोसायटी ऑफ सॅटेलाईट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल्सने प्रोफेसर रामचंद्र रावयांना सॅटेलाईट हॉल ऑफ फेम, वॉशिंग्टनमध्येही सामील केले होते.

१९७६ मध्ये रामचंद्र राव यांना पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये रामचंद्र रावयांना पद्मविभुषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या ८५ व्या वर्षी २४ जुलै २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.