संजय दत्तला जेव्हा तुरुंगाच्या बाहेरचे जेवण येत होते तेव्हा ‘या’ महिला आयपीएसने बघा काय केले होते…

0

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री नेहमीच आपल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी लव्ह जिहाद कायदा लागू केला आहे. या कायद्यावरून पूर्ण देशभरात गदारोळ सुरू आहे.

धर्मविरोधी कायदा लागू केल्यानंतर कायद्याच्या विरोधात १०४ माजी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे. हे पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकर यांच्यासह ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आज आपण मीरा बोरवणकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मीरा या माजी आयपीएस अधिकारी आहे. त्यांची ओळख देशभरात सुपरकॉम अशी आहे. त्यांच्या धडसाचे किस्से चांगलेच प्रसिद्ध आहे.

मीरा या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहे. त्यांचे वडील बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यामुळे मीरा यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण फाजिल्का येथे झाले. १९७१ मध्ये त्यांच्या वडिलांची बदली जालंदर येथे झाली. त्यायामुळे पुढचे शिक्षण त्यांनी तिथे घेतले.

१९८१ मध्ये मीरा या महाराष्ट्र केरडच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांनी कधीही त्यांच्या कर्तव्याच्या आड कोणती गोष्ट येऊ दिली नाही. मीरा यांच्या नावाने अंडरवर्ल्ड पण घाबरायचे.

मीरा यांची बदली मुंबईला झाली होती, तेव्हा त्यांनी मुंबईतील गुंडाईराज संपवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनसोबत अनेक मोठमोठ्या गुंडांना मीरा यांनी तुरुंगात डांबले होते.

मीरा यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना सुद्धा दिलासा नव्हता दिला. संजय दत्त जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याला बाहेरून डब्बा येत होता. त्याची माहिती मीरा यांना मिळाली.

एक दिवस त्यांनी येरवडा तुरुंगात येण्याचा निर्णय घेतला. त्या येरवड्याच्या तुरुंगात गेल्या आणि त्या थेट संजय दत्तकडे गेल्या. तिथे त्यांना पुस्तकं दिसली. संजय दत्तला त्यांच्याबद्दल माहिती होते, तेव्हा मीरा यांनी संजय दत्तला तुरुंगातलेच जेवण घ्यायचे असा दम दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.