मृत्यूनंतरही ‘या’ महिलेने वाचवले चार लोकांचे जीव; कसे ते वाचा…

0

असे म्हणतात एकदा एखाद्या माणसाचा मृत्यु झाला तर तो परत येत नाही, पण आजकाल विज्ञान आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, की मृत्यु झालेल्या माणसाचे अवयव जिवंत माणसाच्या कामी येऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत, ज्या महिलेचा मृत्यु जरी झाला असला तरी जाता जाता त्या महिलेने चार लोकांना अवयव दान करुन त्यांना जीवनदान दिले आहे.

या महिलेचे नाव सैयद रफत परवीन असून ती ४१ वर्षांची होती. परवीन गाजियाबादच्या इंदिरापुरममध्ये राहत होती. तिचा ब्रेन डेडमुळे मृत्यू झाल्याने तिची किडनी, ह्रदय आणि लिवर चार लोकांना ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अचानक परवीनच्या मेंदुच्या नसांमध्ये अचानक ब्लिडींग सुरु झाले. वैशाली येथे असलेल्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांनी तिला वाचण्याचे पुर्ण प्रयत्न केले पण डॉक्टर त्यात अपयशी ठरले. शेवटी परवीन यांची प्राणज्योत मावळली.

डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर कुटूंबाच्या परवानगीनंतर डॉक्टरांनी तिचे अवयव दान करण्याचे ठरवले. परवीनचे ह्रदय, किडनी आणि लिवर वेगवेगळे करण्यात आले. पुढे त्यांनी याबाबतची माहिती नॅशनल ऑर्गन अँड ट्रान्सप्लांट ऑरगनायझेशनला दिली.

परवीनचे ह्रदयला ग्रीन कॉरिडोर बनवून सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात पाठवण्यात आले. तर एक किडनी आणि लिवर दोन रुग्णालय ट्रान्सप्लांट करण्यात आले. तसेच दुसरी किडनी गुरुग्राममध्ये असलेल्या एका रुग्णायलात देण्यात आली.

हार्ट ट्रान्सप्लांट डॉ. केवल कृष्णन यांनी म्हटले की, उत्तराखंडच्या एका ५६ वर्षीय रुग्णाला परवीनचे ह्रदय देण्यात आले आहे. आता त्याची रुग्णाची प्रकृतीपणे चांगली आहे. अशाप्रकारे परवीनने जग सोडून जाताना ४ लोकांचे जीव वाचवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.