११३ वेळा अपयश आले तरी हार मानली नाही, शेवटी टाटांनी दिला साथ आणि उभा केला ‘हा’ ब्रँड

0
  • असे म्हणतात अपयश ही यशाची पायरी आहे, पण ११३ वेळा अपयश आले तर एखादा माणूस नक्कीच आपली हार पत्कारेल. पण ही गोष्ट अपवाद आहे. निधी अग्रवाल नावाच्या तरुणीला आपला ब्रँड उभा करण्यासाठी ११३ गुंतवणूकदारांनी नाकारले, मात्र पुढे त्यांना थेट प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीच हात दिला.

आज जाणून घेऊया निधी अग्रवाल यांची प्रेरणादायी गोष्ट. निधी अग्रवाल यांचा महिलांच्या पोशाखावर काम करणारा ‘कार्य’ नावाचा एक फॅशन ब्रँड आहे. आज ही कंपनी दरमहिन्याला १५० नवीन डिजाईन बाजारात उतरवतात, ज्या १८ वेगवेगळ्या साईजमध्ये महिलांना मिळतात. आज निधी यांनी यशाची उंची गाठली आहे, मात्र त्यांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला होता.

निधी अग्रवाल २०१० मध्ये हनीवेल आणि केपीएमजी यांच्याशी यांच्यासोबत काम केल्यानंतर, त्या ब्रेन कन्सल्टिंगच्या धोरणातील सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा ग्राहकांना भेटायला विमानतळावर जावे लागायचे.

एकदा असेच एका ग्राहकाला भेटायला निधी गेल्या असता, रस्त्यात त्यांच्या अंगावर कॉफी उडाली. त्यामुळे रस्त्यावरच्या एका दुकानात त्या गेल्या आणि साधा पांढरा कुर्ता विकत घेतला. मात्र मोठ्या ब्रँडच्या कपड्यांमधील समस्या अशी आहे की ते एकतर कंबरवर फार मोठे होते किंवा शरीराच्या वरच्या भागावर खूप घट्ट होते. त्यामुळे निधी यांना फिटिंगमध्ये कुर्ता बसत नव्हता.

त्यावेळी, निधी यांना असा प्रश्न पडला की कपड्यांच्या फिटिंगची समस्या फक्त त्यांनाच येतेय की बाकीच्या महिलांनाही येत आहे. त्यासाठी निधी यांनी एक छोटासा सर्व्हे केला. सर्व्हेमध्ये २५० महिलांची माहिती घेण्यात आली, तेव्हा असे लक्षात आले की, जवळपास ८० टक्के महिलांना कपडे फिटिंगची समस्या येत होती.

निधी अग्रवाल यांना सुरुवातीला ‘कार्य’ हा ब्रँड उभा करणे खूप कठीण होते, कारण तिच्या व्यवसायात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मिळत नव्हते. ३६५ दिवसांत त्यांना ११३ लोकांनी नकार दिला. मात्र तरीही निधी यांनी हार मानली नाही, पूढे त्यांना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा ‘कार्य’ या ब्रँडमध्ये गुंतवणूकदार म्हणून मिळाले.

आज बाजारात महिलांच्या कपड्यांमध्ये ६ प्रकारच्या साईज उपलब्ध आहे. पण निधी अग्रवाल यांच्याकडे महिलांच्या कपड्यांमध्ये जवळपास १८ साईज उपलब्ध आहे, ज्या कपडे महिलांना व्यवस्थित बसण्यासाठी पुरेशा आहे. या व्यतिरिक्त ‘कार्य’ महिन्याला १५० पेक्षा जास्त नवनवीन डिझाइन महिलांसाठी बाजारात आणतात.

लोकांसोबत काम करताना एका महिलांना येण्याऱ्या अडचणींचाही सामना निधी यांना करावा लागला. महिला एखादा व्यवसाय करू शकत नाही, असा समज सध्या समाजात आहे.

निधी म्हणतात, एकदा गुडगावच्या फॅक्टरीमध्ये मी काम करत होती. तेव्हा कुरियर बॉय फ्रीझची डिलिव्हरी करण्यासाठी आला. मला बघून त्याने ते फ्रीझ देण्यास नकार दिला. मी तुमच्या मालकांना भेटल्याशिवाय फ्रीझ देऊ शकत नाही, तुमच्या मालकांना बोलवा, असे तो म्हणाला.

तेव्हा फॅक्टरीचा वॉचमेन तिथे आला आणि त्याने कुरियर बॉयला सांगितले की ह्याच या फॅक्टरीच्या मालकीन आहे, तेव्हा कुठे त्या कुरियर बॉयने ते फ्रीझ सोपवले आणि गेला.

निधिने केलॉग स्कूल फॉर मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. तसेच डीन सर्व्हिस अवॉर्ड आणि सीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. धैर्य आणि चिकाटी या दोन गोष्टी यश मिळवण्यासाठी गरजेच्या आहे, असे निधी अग्रवाल म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.