‘या’ पठ्ठ्याने बनवले भव्य शुभेच्छा पत्र; गिनीज बुकमध्ये झाली नोंद

0

आपल्या आयुष्यात १०० पेक्षा जास्त रेकॉर्ड करणारे दुबईतील भारतीय वंशाचे रामकुमार सारंगपाणी यांनी आणखी एक रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे आता याची नोंद थेट गिनीज बुकने घेतली आहे.

रामकुमार यांनी तब्बल ८.२ चौरस मीटर आकाराचे शुभेच्छा कार्ड तयार केले आहे. त्यामुळे त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांची १९ व्या वेळेस त्यांची गिनेस बुकमध्ये नोंद झाली आहे.

दुबईचे सत्ताधीश शेख महंमद बिन राशीद अल मकतुम यांना सत्तेत आल्यापासून १५ वर्षे झाली आहे. त्यानिमित्त सारंगपाणी यांनी भव्य ‘पॉप-अप’ शुभेच्छा कार्ड तयार केले आहे.

कार्डमध्ये दुबईतील चित्रकार अकबरसाहेब यांनी काढलेल्या शेख महंमद यांच्या चित्रांचे कोलाज आहे. या कार्डची लांबी ४ मीटर आहे तर रुंदी २.०५ मीटर इतकी रुंदी आहे.

त्यांनी याआधी पण वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. त्यांनी सर्वात मोठे मॅग्नेट सेंटन्स, सर्वात मोठा मॅग्नेट वर्ड, सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक ग्रीटिंग कार्ड, सर्वात मोठा बंक नोटवर्ड, सर्वात  छोट्या पत्त्यांचा कॅट अशा प्रकारचे रेकॉर्ड त्यांनी केले आहे.

जेव्हा मी सातवीत होतो, तेव्हा माझ्या एका नातेवाईकाने मला पहिले गिनीज बुक दाखवले. त्याचक्षणी मी गिनीज बुककडे आकर्षित झालो होतो. आयुष्यात एकदा तरी गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी अशी माझी इच्छा होती, असे रामकुमार सारंगपणी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.