राजीव गांधींनी फक्त सात महिन्यांमध्ये ‘या’ कारणामुळे ‘या’ पंतप्रधानांची केली होती हकालपट्टी

0

 

तत्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या फळीतील अखेरचा शिलेदार असे वर्णन माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे आहे. ते भारताचे नववे पंतप्रधान होते.

नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ एवढाच काळ चंद्रशेखर पंतप्रधान होते. असे म्हटले जाते की, राज्यमंत्री, केंद्रीयमंत्री न बनता ते थेट पंतप्रधान झाले होते.

चंद्रशेखर हे उत्तरप्रदेशातील बलियाचे होते. ते एक उत्तम वक्ता होते. तसेच लोकनेते आणि लेखक होते. ते आपले मत स्पष्टपणे मांडत होते. त्यामुळे अनेक लोकांसोबत बऱ्याचदा त्यांचे जमत नसायचे.

१९७५ जेव्हा आणीबाणी करण्यात आली होती, त्यावेळी ज्या काँग्रेस नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते, त्यात चंद्रशेखर पण होते.

आणीबाणीनंतर जेव्हा त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, तेव्हा विरोधी पक्षांनी जनता पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. जेव्हा आपल्या पक्षाचे सरकार बनले तेव्हा चंद्रशेखर यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला होता.

विश्वानाथ प्रताप यांना राजीव गांधींची हेरगिरी केल्याच्या आरोपातून राजीनामा द्यावा लागला होता. कॉंग्रेसने त्यांचा पाठिंबा काढुन घेताच, चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

त्यावेळी चंद्रशेखर यांना पंतप्रधान बनवण्यात आले होते. ते फक्त सात महिनेच पंतप्रधान होते. सात महिन्यात राजीव गांधी यांनी पाठिंबा काढुन घेतल्याने चंद्रशेखर यांना पंतप्रधान पद सोडावे लागले होते.

ते जितके राजकारणात सरळ आणि स्पष्ट बोलायचे, तितकेच ते घरात पण स्पष्ट होते. त्यांच्या मुलाला जेव्हा राजकारणात यायचे होते, तेव्हा त्यांनी त्याला थेट घर सोडुन जाण्यास सांगितले होते.

त्यांच्या मुलाचे नाव पंकज असे होते. त्याला आपल्याच पक्षातून म्हणजे समाजवादी जनता पक्षातुन त्याला राजकारणात यायचे होते. त्याने चंद्रशेखर यांना न विचारताच बिहारच्या महाराजगंजच्या लोकसभेच्या जागेवरुन निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली.

जवळजवळ चार पाच महिने त्याने आपल्या मतदार संघाच्या भेटी वाढवल्या आणि एक दिवशी पंकज चंद्रशेखर यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्यासमोर दोनच अटी ठेवल्या.

एक म्हणजे कुटुंबाशी सर्व संबंध तोडुन त्यांचे घर सोडुन जायचे. दुसरी म्हणजे पाच वर्षे त्या मतदारसंघात कार्यकर्ता म्हणुन काम करायचे. जर पक्षाला काम आवडले तरच तुला तिकीट देण्यात येईल.

पंकजला राजकारणात लवकरात लवकर करायचे होते पण चंद्रशेखर यांच्या अटी पंकजला परवडणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे त्याने राजकारणात न घेण्याचा निर्णय घेतला.

अनेक राजकीय नेते आपल्या मुलांना राजकारणाची ओळख करुन देतात, पक्षात स्थान मिळवून देतात, पण आपला मुलगा राजकारणात येत असेल तर घर सोडुन जा असे म्हणणारे  चंद्रशेखर एकमेवच नेते असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.