जगातील सर्वात ताकदवान बिल्डर लॅरीला ‘या’ मराठमोळ्या पठ्ठ्याने पंज्यामध्ये चारली धूळ

0

भारतात आपले शक्ती प्रदर्शन करायचे असेल तर माणूस नेहमी पंजा खेळून दाखवत असतो. अशात जर तुम्हाला परदेशातल्या सगळ्यात ताकदवान माणसाबरोबर पंजा खेळायला लावला तर..? विचारात पडला ना.

असेच काहीसे झाले आहे राहुल पॅनिकरसोबत. पण भारताचा हा पठ्ठ्या त्याच्यावर चांगलाच भारी पडला आहे. कोच्चीला राहणाऱ्या राहुलने जगातील सर्वात ताकदवान बॉडी बिल्डर लॅरी व्हील्सला पंजात हरवले आहे.

राहुलचा हा आर्म रेसलिंगचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून सगळीकडेच त्याचे कौतुक होत आहे. राहुल याचे नाव जास्त लोकांना आधी माहीत नव्हते पण आता सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

राहुल भारताचा आर्म रेसलिंग चॅम्पियन आहे. त्याने नुकताच जगातील सर्वात ताकदवान बॉडी बिल्डर लॅरी व्हील्ससोबत पंजा लढवला असून त्याला पराभूत केले आहे. पण हा वाटतो तितका सोपा नव्हता, याआधी राहुल दोन राऊंड हरला होता.

तिसऱ्या राऊंडमध्ये राहुलने लॅरीला जोरदार टक्कर दिली आणि तो सामना जिंकला. राहुलच्या या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा सामना दुबईत खेळण्यात आला होता.

या सामन्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत असून या व्हिडीओमध्ये तो लॅरीला हरवताना दिसून येत आहे. राहुल गेल्या १० वर्षांपासून आर्म रेसलिंग करत असून त्याने आतापर्यंत ६ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहे.

राहुलला रेस्टलिंगचे धडे लहानपणापासूनच मिळाले आहे. त्याचे वडील पिटी पॅनिकर आयआरएस अधिकारी होते. तसेच ते पॉवरलिफ्टर सुद्धा होते. एकदा १२ वीला असताना राहुलने जिल्हास्तरीय खेळाडूसोबत पंजा लढवला होता पण तेव्हा तो हारला होता. आज मात्र त्याने जगातल्या सगळ्यात ताकदवान बिल्डरला पंजात हरवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.