पुण्यात पिझ्झा विकणाऱ्या माणसाने मुलाच्या उपचारासाठी तीन वर्षात जमा केले १ कोटी ७० लाख

0

लहान मुल आपल्या आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असतो. पण आपल्याला नेहमीच आईची माया, आईचे प्रेमच दिसते. चित्रपटात पण बऱ्याच वेळा आपण तेच बघतो. वडिलांचे प्रेम तेवढेच असते, पण ते आपल्याला कधी दिसत नाही.

आज आपण एका अशा माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या मुलाच्या उपचारासाठी १ कोटी ७० लाख रुपये जमा केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या महिन्याचा पगार १५ हजार आहे, तरी त्यांनी तीन वर्षात १ कोटी ७० लाख रुपये जमवले आहे.

मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव सागर मेश्राम असे आहे. त्यांच्या मुलाचे नाव प्रियांशू असे आहे. प्रियांशू गेल्या सहा वर्षांपासून एका गंभीर आजाराशी लढत आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक करून सागर हे पैसे जमा करत आहे.

सागर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करतात, या कामातून त्यांना महिन्याला फक्त १५ हजार रुपये पगार मिळतो. सागर गेल्या ३ वर्षे ८ महिन्यापासून आपल्या मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवत आहे.

इतक्या वर्षांपासून त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांना उपचारासाठी लागणारी १ कोटी ७० लाख इतकी रक्कम जमवण्यात यश आले आहे. अमेरिकेतल्या बॉस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये प्रियांशूवर उपचार करण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये त्याला उपचारासाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे.

सागर भोपाळच्या भदभदा परिसरात राहतो. प्रियांशू लहान असताना त्याची अचानक त्याची तब्बेत बिघडली. त्यावेळी तो फक्त चार महिन्याचा होता. त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला गंभीर आजार असल्याचे सांगितले.

प्रियांशूला डबल आऊटलेट राईट वेन्ट्रिकल विथ लार्ज मस्क्युलर वेन्ट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट असा आजार असल्याचे डॉक्टरांनी सागर यांना सांगितले. या आजारात हृदयात एक मोठे छेद असते. त्यामुळे हृदयातील रक्त मोठ्या वेगाने फुफ्फुसात जाते.

प्रियांशू उपचारासाठी सुरुवातीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे असे डॉक्टरांनी असे सांगितले की, याचा उपचार जन्म झाल्यानंतर एक दोन आठवड्यात होणे गरजेचे होते.

एम्सच्या डॉक्टरांनी दिल्लीतील फॉर्टीस रुग्णालयातील डॉ. एस के अय्यर यांना भेटण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी प्रियांशूवर तीन शस्त्रक्रिया करण्यात येईल, तरीही प्रियांशू दहा वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नाही.

२०१५ मध्ये प्रियांशूची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यासाठी बाल स्वाथ्य अभियानातून १ लाख रुपये त्यांना मिळाले होते. पुढची शस्त्रक्रिया दोन वर्षांनी होती. तसेच आर्थिक स्थिती खराब असल्याने त्यांना मुंबईत राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात येऊन पिझ्झा डिलिव्हरीचे काम सुरू केले. यात त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मिळत होते.

दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी भोपाळ येथील घर विकून टाकले. जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी दुसऱ्या शस्त्रक्रियेला खूप वेळ झाला असल्याचे सांगितले.

त्यामुळे सागर मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद सारख्या मोठमोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये गेले. या आजाराविषयी त्यांनी सोशल मीडियावर माहिती काढली. त्यावरून त्यांना अमेरिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये याचा उपचार शक्य आहे, असे समजले.

सागर यांनी रुग्णालयाला इमेल केला त्यावेळी हॉस्पिटलने सागर यांना ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. पण सागर यांच्याकडे पैसे नव्हते, सागर यांनी आपली सगळी कहाणी हॉस्पिटलला सांगितली. त्यावर उपचार शक्य आहे, त्यासाठी ६५ हजार भरण्यास अमेरिकेच्या हॉस्पिटलने सांगितले. पुढे हाच खर्च १ कोटी ७० लाखांवर पोहचला.

दिवसरात्र मेहनत करून, रस्त्यावर उतरून, सोशल मीडियावर मदत मागून मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मागितली. त्याचे मुलासाठीचे अथक परिश्रम पाहून अनेक लोकांनी त्याची मदत केली आहे. आता लवकरच प्रियांशूवर उपचार करण्यात येणार आहे. एक आदर्श वडील म्हणून सागर हे एक उत्तम उदाहरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.