सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला निजाम आज दोन खोल्यात राहतोय, वाचा त्याची कहाणी

0

हैदराबादचे निजाम मुकर्रम जेह यांची आज आम्ही तुम्हाला कहाणी सांगणार आहोत. आता ते इतिहासाचा हिस्सा जरी असले तर एक असा काळ होता जेव्हा त्यांचा परिवार जगातील सर्वात श्रीमंत परिवारातील एक परिवार होता.

ते नेहमी चर्चेत असायचे. आता सध्या कोणालाच माहीत नाही ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत. काही दिवसांपूर्वी ते चर्चेत आले होते. फ्रांसमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि आज त्यांचे वय ८७ वर्षे आहे.

त्यांच्यानंतर कोणीच निजाम नाही बनले. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३३ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांनंतर त्यांना ८ वा निजाम बनविण्यात आले होते. आजही त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे पण ती संपत्ती मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे.

लोक म्हणतात की त्यांच्यावर खूप कर्ज आहे. हैदराबादमधील एका फ्लॅटमध्ये ते आपले जीवन जगत आहेत. त्यांनी ५ लग्न केले होते. त्यांना मुले आहेत पण सध्या त्यांच्यासोबत कोणीच राहत नाही.

त्यांची आई जगातील सर्वात सुंदर महिला होती असे बोलले जाते. असे म्हणतात की निजामाची इतकी संपत्ती होती की तिला मोजणेही कठीण होते. त्यांच्याकडे अनेक किलो हिरे आणि कितीतरी टन सोने होते.

किंमती वस्तूही खूप होत्या आणि प्रॉपर्टी, महाल आणि पैसे अशी खूप मोठी संपत्ती त्यांच्याकडे होती. सातव्या निजामाचा मृत्यू १९६७ मध्ये झाला होता. त्यानंतर निजामच्या पदावर बसायचा हक्क सगळ्यात मोठा मुलगा आजम जाह याचा होता पण असे झाले नाही.

त्या पदावर त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा मुकर्रम जेह याला बसविण्यात आले. मुकर्रम यांनी आपले शिक्षण बाहेर देशात केले. त्यांचे शिक्षण हैरो आणि लंडनच्या कॅब्रिज युनिव्हर्सिटी येथे झाले.

जेव्हा त्यांना पदावर बसवण्यात आले होते तेव्हा ते भारतातील सगळयात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांना हैदराबादमध्ये राहायला आवडत होते. ७० च्या दशकात त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे एक खूप मोठा आलिशान बांगला खरेदी केला.

ते तिथे आपली पहिली पत्नी इजरा हिच्यासोबत राहायला जाणार होते पण त्यांच्या पत्नीने ऑस्ट्रेलियाला राहण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांना आपल्या पत्नीला खूप मोठी रक्कम द्यावी लागली. ऑस्ट्रेलियाला त्यांनी खूप पैसा उडवला.

त्यांनी तिथे एका एअर होस्टेस बरोबर लग्न केले. तिचे नाव होते सीमोन्स जीने बीबीसीमध्येही काम केले होते. लग्न झाल्यानंतर तिने धर्मपरिवर्तन केले आणि ती आयशा बनली. त्यानंतर अशी बातमी आली की आयशाचा मृत्यू एड्समुळे झाला.

नंतर अशी बातमी आली की मुकर्रम यांना जेव्हापण पैशांची गरज पडायची तेव्हा ते हैदराबादमधून आपल्या सेवकांकडून पैसे मागवून घ्यायचे. त्यांनी किती पैसे मागवले याचा कसलाही हिशोब कोणाकडेच नाही.

त्यानंतर त्यांच्या महालातील किमती वस्तू आणि सोने, , चांदी गायब होऊ लागले. एक वेळ अशी आली की पूर्ण खजाना खाली झाला होता. ९० च्या दशकात निजाम कर्जबाजारी झाला होता. नंतर त्यांनी एका सोनाराला आपले मॅनेजर बनवले आणि त्याच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली.

जेव्हा ही रक्कम जास्त झाली तेव्हा सोनाराने त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला. तरीही त्याचे म्हणणे होते की मला माझी पूर्ण रक्कम मिळालेली नाही. सध्या कोर्टात ही केस सुरू आहे.

सध्या अशी परिस्थिती झाली आहे की निजामला त्यांची हैदराबादची प्रॉपर्टी विकताही येत नाहीये कारण ही संपत्ती ट्रस्टच्या अधिपत्याखाली गेली आहे. जेव्हा या संपत्तीची बिकट अवस्था होऊ लागली तेव्हा त्यांच्या पहिल्या बायकोने ट्रस्टला बरोबर घेऊन या संपत्तीला परत उभारण्याचे प्रयत्न चालू ठेवले होते.

फलकनुमा पॅलेस हॉटेल ताज ग्रुपला देण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांनी तिसरे लग्न केले होते. हे लग्न फक्त ५ वर्षे चालले. त्यांनतर त्यांनी आणखी २ लग्न केले होते. त्यांना ५ मुले आहेत. आता सध्या ते तुर्कीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहतात. हैदराबादमध्ये ते कधीकधी येतात. ८७ च्या वयात ते आजही कर्जात बुडालेले आहेत.

त्यांच्याकडे काही संपत्ती उरली आहे. त्यांना अनेक रोग झालेले आहेत. त्यांची बुद्धी कमजोर झाली आहे. ते एकटे पडले आहेत. असे म्हणतात की त्यांच्याकडे ७०० करोडची संपत्ती आहे पण कायद्यानुसार त्यांना ती संपत्ती विकण्याचा अधिकार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.