कौतुकास्पद! एकेकाळी बिडी विकणाऱ्या आजोबांनी २५ वर्षे मेहनत घेऊन बनवली ४ भाषांची डिक्शनरी

0

आज सर्वत्र इंटरनेटचे जाळे पसरले आहे. तुम्ही फक्त एका क्लिकवर हवी ती माहिती मिळवू शकतात. अनेकदा आपल्याला काही दुसऱ्या भाषेंचे शब्द अडतात, पण त्यासाठीही गुगल ट्रान्सलेट आता उपलब्ध आहे.

गुगल ट्रान्सलेटरमुळे आपल्याला हव्या त्या भाषेचे भाषांतर करता येते. पण हा या सर्व गोष्टींना इंटरनेट लागतेच. त्यामुळे जिथे इंटरनेट नाही तिथे आजही लोकं पुस्तक वाचून माहिती मिळवताना दिसतात.

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या माणसाने चौथीमध्ये असताना शाळा सोडली पण आता त्याच माणासानाने ८३ व्या वर्षी ४ भाषांची डिक्शनरी लिहली आहे.

केरळच्या तालासरी परिसरात राहणाऱ्या या आजोबांचे नाव नजात्तेला श्रीधरण असे आहे. त्यांचे वय ८३ असून त्यांनी लोकांसाठी ४ भाषांची डिक्शनरी तयार केली आहे. त्यांनी तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा चार भाषेत डिक्शनरी लिहली आहे. या कामासाठी त्यांना २५ वर्षे लागली आहे.

श्रीधरण यांनी आपले शालेय शिक्षण पुर्ण घेतलेले नाही. त्यांनी चौथीला असतानाच शाळा सोडली होती. त्यानंतर त्यांनी बिडीच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. तिथेच त्यांनी ईएलसी पास केले. पुढे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्यास सुरुवात केली.

श्रीधरण यांनी १९८४ पासूनच डिक्शनरीवर काम करण्यास सुरुवात केली. पण त्यांनी पीडब्लुडीची नोकरी १९९४ मध्ये सोडली. त्यानंतर त्यांनी सगळे लक्ष डिक्शनरीकडेच दिले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ही डिक्शनरी बनवण्यास सुरुवात झाली.

त्यांनी डिक्शनरी बनवण्यासाठी स्वता: चारही भाषा पुर्णपणे शिकून घेतल्या. त्यानंतर डिक्शनरी बनवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. ते दिवसातून कितीतरी तास शब्दांवर काम करत बसायचे.

डिक्शनरी पुर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रकाशनाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकाशनांना भेट दिली, तसेच वेगवेगळ्या संस्थांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्या पण सगळीकडुन त्यांना नकाराचा सामना करावा लागला.

तरीही त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली त्यामुळे अखेर केरळच्या सिनियर सिटीजनच्या फोरमच्या सामुहिक मदतीने नोव्हेंबर २०२० मध्ये ही डिक्शनरी प्रकाशित झाली आहे. या डिक्शनरीत ९०० पाने असून त्याची किंमत १५०० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.