सलाम! जीवाची पर्वा न करता ‘या’ महिला पोलिसाने पाण्यात बुडणाऱ्या मुलीचा वाचवला जीव

0

गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील एक मनोरुग्ण असणाऱ्या मानसिक महिलेचा पोलिसांनी जीव वाचवला होता. तसेच आता पुन्हा पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे एक तरुणीचा जीव वाचला आहे.

मालवणी पोलीस ठाण्याचे म. स. पो. नि. अनिता कदम आणि पो. शि. चव्हाण यांच्या प्रसंगासावधामुळे तरुणीला वाचवण्यात यश आले आहे. तरुणी पाण्यात आत्महत्या करत असताना त्यांनी पाण्यात जाऊन त्या तरुणीचा जीव वाचवला आहे.

अक्सा बीचवर ही मुलगी आत्महत्या करत होती. त्याबाबत तरुणीने आपल्या वडिलांच्या व्हाट्सअ‍ॅपवर आपण आत्महत्या केल्याचा सांगितले होते, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बीचकडे धाव घेतली.

त्यांनी तातडीने पाण्यात धाव घेतली आणि त्या तरुणीला पाण्यात बुडण्यापासून वाचवून तिचा जीव वाचवला. त्यामुळे अनिता कदम याचे सगळीकडेच कौतुक केले जात आहे.

तसेच पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ट्विट करून या महिला पोलिसाचे कौतुक केले आहे. जीवाची पर्वा न करता अनिता कदम आणि पीसी चव्हाण यांनी अक्सा बीचवर आत्महत्या २३ वर्षीय तरुणीचा जीव वाचवला आहे.

त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि त्यांचे धाडस कौतुकास्पद, असे ट्विट करत आयुक्त परमबीर सिंग यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

जीवाची पर्वा न करता महिला पोलीस अनिता यांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला आहे. अनिता कदम यांच्या प्रसंगावधानपणामुळेच त्या तरुणीचा जीव वाचला आहे. अनिता कदम यांचे हे धाडस खरंच कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.