अडखळत बोलणारा इंजिनियर ते अख्ख्या जगाचा हास्यसम्राट, एकदा वाचा मिस्टर बिनची स्टोरी

0

अनेकदा आपण लहान मुलांना त्यांच्या वागण्यावरुन, बोलण्य़ावरुन त्यांना लेखत असतो. बऱ्याचदा बोलण्याच्या आणि वागण्याच्या वेगळेपणामुळे जगासमोर तुम्ही तुमची ओळख बनवत असतात.

काही वेळेला घरात तर विचित्र वागणाऱ्या मुलाचे कौतुक केले जाते, पण बाहेर त्या मुलाला लोक नाव ठेवत असतात. अशात ज्या मुलांसोबत लहानपणी वाईट वागणुक दिलेली असते, त्याचा परिणाम आयुष्यभरासाठी त्यांच्या मनावर होत असतो

काही लोक असे असतात, ज्यांना लहानपणी लोकांनी नावे ठेवलेली असतात, पण आपल्या जिद्दीच्या जोरावर ते आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करतात आणि यशस्वी होतात. यातलेच एक नाव रोवन एटकिंसन म्हणजेच ‘मिस्टर बिन’.

आपल्या चेहऱ्यावरील हावभावाने त्यांनी सर्वांनाच हसवले. ९० च्या दशकातील असा एक पण मुलगा नसेल ज्याला मिस्टर बीन माहित नसेल. जवळपास ५ वर्षे त्यांचा हा शो चालला होता. यात लहान मुलांपासून मोठं मोठे माणसं पण मिस्टर बिनचे फॅन होते.

मिस्टर बिन शिवाय ‘ब्लॅकेडर’, ‘नाइन ओ क्लॉक न्यूज’, ‘द सीक्रेट पुलिसमैन्स बॉल्स’ आणि ‘द थिन ब्लू लाइन नाम’ नावाच्या शो मध्ये पण त्यांनी काम केले आहे.

त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला होता. त्यांना लहानपणापासून एक आजार होता त्यामुळे ते अडखळत बोलायचे. त्यांच्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे त्यांना लोकांनी लहानपणापासूनच टोमणे मारण्यास सुरुवात केली होती.

वयाने लहान असणारे रोवन या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे ते खूप शांत राहायचे कोणासोबतच बोलायचे नाही. शिक्षकांना सुद्धा रोवन यांची काळजी वाटायची.

त्यांना लहानपणापासून विनोदी भूमिका करण्याची आवड होती. त्यासाठी त्यांनी एक कॉमेडी ग्रुप जॉईन केला होता. ते एक इंजिनिअर होते तरीही ते अभिनयाची आवड असल्याने टीव्ही शोसाठी ऑडिशन द्यायचे. अनेक चॅनेलांनी रोवन यांना नाकारले, मात्र रोवन यांनी आपली जिद्द सोडली नाही.

त्यामुळे विनोदी पात्र लिहणे आणि त्या टोनमध्ये बोलण्याचे काम रोवन यांनी सुरू केले. विशेष म्हणजे जेव्हा ते एखादे पात्र बनवायचे आणि त्याचा संवाद बोलताना ते कधीच अडखळायचे नाही.

त्यांनी एक असे पात्र तयार केलं जे दिसायला थोडं विचित्र होतं. तसेच ते पात्र न बोलता त्याच्या कृतीतुन खूप काही बोलून जाणार होतं. याच पात्राने त्यांना जगभरात ओळख निर्माण करून दिली ते पात्र म्हणजे ‘मिस्टर बिन’. या पात्रामुळे रोवन रोतारात सुपरस्टार झाले.

पुढे ते जगातील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांपैकी एक झाले. सिनेमाची सुरुवात त्यांनी जेम्स बॉन्डच्या नेवर से नेवर या चित्रपटातुन केली होती. आपल्या अभिनयाने जगाभरात त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

सिनेमात किंवा शोमध्ये लागणाऱ्या हिरोसारखी शरीरयष्ठी नसताना त्यांनी जगाभरात आपली ओळख निर्माण केली आहे है विशेष. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, लोक टोमणे मारत असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे धाव घेतली तर आपण नक्कीच यशस्वी होतो, हे रोवन यांनी दाखवून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.