आपल्या चहाच्या टपरीवर ४० प्रकारच्या चहा ठेवणारा ‘हा’ पठ्ठ्या माहितीये का..?

0

आज काल चहाच्या प्रकारात खूप वाढ झालेली आहे, कुठे अमृत्यूल्य, कुठे येवले, तर प्रेमाचा चहा. पण तुम्हाला एमबीए चहावाल्याबद्दल माहितीये का..?

आज जाणून घेऊया एमबीए चहावाल्याबद्दल. ज्याने एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडून चहाची दुकान सुरू केली आणि आज त्याची दुकान एमबीए चहावाला म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

ही गोष्ट आहे प्रफुक बिलोरची. प्रफुल एमबीए करत होता पण त्याने एमबीए अर्धवटच सोडले आणि एक कॅफे सुरू केले त्याचे नाव ‘एमबीए चहावाला’ असे ठेवले.

२२ वर्षीय प्रफुलला ही आयडिया व्हॅलेंटाईन डे मधून आली होती. त्याच्या असे लक्षात आले की, व्हॅलेंटाईन डे मध्ये प्रत्येक जण आपल्या प्रियकराला खुश करण्यासाठी प्रयत्न करत राहतात.

पण सिंगल तरुण तरुणींसाठी कोणीच काही करत नाही, तर त्या लोकांना फ्रीमध्ये चहा देण्याचे प्रफुलने ठरवले. तेव्हापासून त्याने सिंगल लोकांना फ्रीमध्ये चहा देण्याचे ठरवले.

प्रफुलचे हे कॅफे अहमदाबादच्या वस्त्रापुरमध्ये आहे. तसेच देशाच्या टॉप बिझनेस स्कुलमध्ये त्याने प्रवेश घेतला. त्याला नातेवाईकांकडून विरोध झाला पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यानंतर त्याने स्वतःचीच टी स्टॉल सुरू केला.

पुढे २०१७ मध्ये त्याने ८ हजार रुपये गुंतवणूक करून आपला व्यवसाय सुरू केला. त्याला माहित होते की, भारतीय लोकांना चहा खूप आवडतो त्यामुळे चहाचाच व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला होता.

त्याच्या या व्यवसायाला एक वर्षाच्या आतच यश मिळाले. त्याने चहासोबत स्नॅक्स विकण्यास सुरुवात केली. तसेच व्हॅलेंटाईनला तो सिंगल लोकांसाठी संध्याकाळी ७ ते १० पर्यंत चहा फ्रीमध्ये देतो.

विशेष म्हणजे त्याच्याकडे चहाचे ४० प्रकार आहे. त्यांच्या किंमती २० ते ५० रुपयांपर्यंत आहे. तसेच त्याच्या कॅफेत ३५ प्रकारचे वेगवेगळे पदार्थ त्याने विकायला ठेवलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.