एकेकाळी ट्युशन घेणारा माणूस आज ‘असे’ कमवतोय महिन्याला २६० कोटी; वाचा प्रेरणादायी प्रवास

0

आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच कोणता ना कोणता व्यवसाय करण्याची इच्छा असते, पण अनेकदा त्याच्यातली गुंतवणूक जास्त असल्याने व्यवसाय करणे आपण टाळतो.

जर तुमची आयडिया भन्नाट असेल तर तुम्ही कमी पैसे गुंतवून पण चांगला नफा मिळवू शकतात. आजची हि गोष्ट अशाच एका तरुणाची आहे, ज्याने २ लाख रुपये गुंतवून कंपनी सुरु केली होती. पण आज तो याच कंपनीच्या माध्यमातून महिन्याला २६० कोटी रुपये कमवत आहे.

हि गोष्ट आहे केरळच्या बायजू रविंद्रनची. एकेकाळी मुलांची ट्युशन घेणारा रविंद्रन बायजू इंडिया कंपनीचा संस्थापक आहे. आज या कंपनीची कमाई महिल्याला २६० कोटींपेक्षा जास्त आहे, तर वर्षाला ही कंपनी ३ हजारपेक्षा जास्त कोटींची कमाई करत आहे.

बायजु कंपनीत फेसबुक फाउंडर मार्क जुकरबर्ग यांची संस्था चान जुकरबर्ग इनिशीएटीवने ५ हजार डॉलरची गुंतवणूक केली होती. या कंपनीची मार्केट व्हॅल्यु जवळपास ३९ हजार ३३० कोटी आहे. या कंपनीत २१ टक्के हिस्सेदारी रविंद्रन यांची आहे.

रविंद्रन यांना लहाणपणापासूनच शिक्षक बनायचे होते. पण शिक्षकाची नोकरी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी कालीकट युनिव्हर्सिटीतून इंजिनियरिंगची शिक्षण पुर्ण केले आणि एका शिपींग कंपनीला जॉईन केले.

त्यावेळी त्यांचे काही मित्र एमबीएची तयारी करत आहे. त्यामुळे त्यांनी कंपनीत काम करता करता एबीए करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना कोचिंग सुरु करण्याची आयडीया आली. त्यांनी कोचिंग सुरु केली असता त्यांना यातुन चांगली कमाई होऊ लागली.

२००९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी कॅटसाठी ऑनलाईन लर्निंग प्रोग्राम सुरु केला. तिथुनच त्यांना ऑनलाईन क्लासची कंपनी सुरु करण्याचा विचार आला, २०११ मध्ये त्यांनी बायजू इंडिया कंपनीला सुरुवात केली. तर २०१५ मध्ये रविंद्रन यांनी बायजू लर्निंग ऍप लाँच केले.

मोबाईलच्या विश्वात ऑनलाईन लर्निंगसाठी ‌ऍप काढणे गेमचेंजर ठरले. आज या कंपनीची वार्षिक कमाई ३ हजारांपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली होती, त्यात पण बायजू रविंद्रन यांचे नाव होते. त्यांची सध्याची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.