..तेव्हा बिरबलचा मृतदेहदेखील सापडला नव्हता, वाचा बिरबलच्या मृत्युची हृद्यद्रावक कहाणी

0

तुम्ही अकबर बिरबलच्या लहानपणी अनेक गोष्टी ऐकल्या असतील. अकबरच्या खास नवरत्नांमधील एक व्यक्ती म्हणजे बिरबल होता. तो त्याच्या हाजिरजबाबीपणा आणि बुद्धिमत्तेसाठी ओळखला जायचा.

बिरबलचे खरे नाव महेशदास होते. आजच्याच दिवशी बिरबरलचा मृत्यु झाला होता. जेव्हापण बादशाह अकबर कोणत्या संकटात सापडायचे तेव्हा ते बिरबरलाच बोलवायचे. बिरबल कधीच आपल्या बादशाहला निराश करत नसे.

बिरबल आणि अकबर बादशाह यांची दोस्ती सगळ्यांनाच माहित आहे. अकबर बादशाहाला बिरबल खुप प्रिय होते. दोघे इतके जवळचे मित्र होते की जेव्हा बिरबलचा मृत्यु झाला तेव्हा अकबर बादशाह पुर्णपणे खचले होते.

साल १५८६ मध्ये बाघी लोकांसोबत लढाई करताना बिरबल यांचा मृत्यु झाला होता. शाजी जमां यांनी अकबर हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की इसवीसन पुर्व १५८६ मध्ये जैन खां कोका याला युसूफजई समुहाला संपवण्यासाठी तैनात करण्यात आले होते.

जेव्हा त्याने अजून सैन्य मागवले तेव्हा अकबर बादशाहने बिरबलला त्या ठिकाणी पाठवले. बिरबलच्या मागे मागे अकबरने हकीम अबुल फतह यालासुद्धा पाठवले. बिरबलचे आणि जैन खां कोका, हकीम अबुल यांच्यासोबत चांगले संबंध नव्हते.

बिरबल आणि ते दोघे आपल्या सैन्यासोबत संकरे या डोंगराच्या रस्त्याने चालले होते. त्या ठिकाणी भयानक युद्ध झाले. बाघी लोकांनी चारही बाजूने हत्यारे आणि दगडाने हल्ला चढवला. हल्ला इतका घातक होता की बिरबलचा मृतदेहसुद्धा सापडला नाही.

जेव्हा बिरबलच्या मृत्युची बातमी अकबर बादशाहला कळाली तेव्हा अकबरची झोप उडाली होती. बादशाहने जेवणही सोडले होते. त्यानंतर राजा मान सिंह याने अकबर बादशाहला शब्द दिला की ज्या राजाने बिरबलला मारले त्या राजाला मी सोडणार नाही. त्याला तुमच्या समोर उभे करेण आणि त्याचे राज्य उध्वस्त करून टाकेण.

त्यानंतर अकबर बादशाह म्हणाला की, बिरबल त्यांचा ब्राम्हण मित्र होता. त्याचा मृतदेह सापडला तर तो गंगा नदीत विसर्जित करून टाका. आपल्या अनोख्या स्वभावामुळे बिरबल दिवसेंदिवस अकबर बादशाहचा आवडता व्यक्ती झाला होता.

जेव्हा फतेहपुर सिकरी निर्माण करण्यात आली तेव्हा तेथे अकबर बादशाहने बिरबलसाठी एक किल्ला बांधला होता. जेणेकरून अकबरला रोज बिरबलची भेट घेता यावी. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.