वडिलांच्या निधनानंतर ‘हा’ दिव्यांग तरुण विकत होता बांगड्या; आता जिद्दीच्या जोरावर बनला IAS

0

माणसाच्या अंगात जर कष्ट घेण्याची ताकद असेल आणि त्याला जर चिकाटीच्या जोड असेल, तर परिस्थिती कितीही गरिबीची असो तो माणूस एक दिवस नक्कीच त्याची परिस्थिती बदलू शकतो.

आजची हि गोष्ट अशाच एका तरुणाची आहे, जो दिव्यांग असून एकेकाळी बांगड्या विकत होता. आज तोच तरुण आएएस झाला आहे. सोलापुरच्या बार्शी गावात राहणाऱ्या या आएएसचे नाव रमेश घोलप असे आहे.

रमेशला लहानपणापासूनच पोलिओ होता. त्याच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती आधीपासुनच चांगली नव्हती. रमेशचे वडिलांना दारुचे व्यसन होते. त्यामुळे रमेश बारावीला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.

वडिलांच्या निधनानंतर पुर्ण जबाबदारी रमेशच्या आईवर आली होती. त्यामुळे त्यांनी बांगड्या विकण्याचे काम सुरु केले. आठवड्या बाजारात रमेश सुद्धा बांगड्या विकायचा.

वडिलांच्या निधनानंतर चार दिवसातच महाविद्यालयात त्याचा केमिस्ट्रीचा पेपर होता. त्याला या परिक्षेला बसायचे नव्हते, पण आईच्या आग्रहाखातीर त्याने परिक्षा दिली. रमेश आधीपासुनच हुशार होता, जेव्हा त्याने बारावीची अंतिम परिक्षा दिली तेव्हा त्याला ८८.५ टक्के इतके गुण मिळाले.

इतके चांगले टक्के असुनही त्याने डिएड करण्याचे ठरवले कारण शिक्षक म्हणून नोकरी करणे मिळवणे आणि त्यातुन आपल्या कुटूंबाला सांभाळणे सोपे होते. आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर २००९ मध्ये शिक्षक म्हणून रमेश कामाला लागला.

काही वर्षानंतर काम केल्यानंतर त्यांनी युपीएसची परिक्षा देण्याचे ठरवले. त्यामुळे कर्ज काढून रमेशने सहा महिन्यांची सुट्टी घेतली आणि पुण्याला येऊन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला.

त्याने जिद्दीने अभ्यास करुन आएएस परिक्षा पास केली. त्यामुळे राहण्यासाठी त्याला वसतिगृह आणि शिष्यवृत्ती मिळाली. २०१२ रमेशची निवड आएएस म्हणून झाली.आपल्या जिद्दीच्या जोरावर IAS बनणारा रमेश आता अनेकांसाठी प्रेरणादायी बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.