शिवसेनेचा होता ‘घाशीराम कोतवाल’ला विरोध, शरद पवारांनी ‘असा’ चकमा देत केली होती कलाकारांची मदत

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील खूप नावाजलेले नाव आहे. तसेच त्यांचा राजकारणासोबतच कलेशी खूप जवळचा संबंध आहे. अनेकदा कला विरोधात राजकारण असा प्रसंग आला तर त्यांनी नेहमीच कलेची बाजू घेतली आहे.

कला आणि राजकारण कधीही एकत्र केले जाऊ नये, असे नेहमीच शरद पवार म्हणत असतात. असाच काहीसा किस्सा आज आपण पाहणार आहोत ज्यात शरद पवारांनी आपल्या गनिमी काव्याने राजकारणाला हरवत कलेला जिंकवले होते.

१९८० मध्ये ‘घाशीराम कोतवाल’ असे विजय तेंडुलकरांनी लिहलेले एक नाटक होते. त्याकाळी हे नाटक प्रचंड गाजत होते. मात्र काही कारणांमुळे हे नाटक वादग्रस्तदेखील ठरत होते. अनेक संघटनांकडून या नाटकाला विरोध केला जात होता.

हे नाटक जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केले होते. तेव्हा या नाटकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या बर्लिन नाट्य महोत्सवाचे आमंत्रण आले. त्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ आता परदेशी जाणार हे निश्चित झाले होते. तसेच युरोपातही अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होईल असं ठरवण्यात आले होते.

मात्र घाशीराम कोतवाल हे नाटक परदेशात जाणार नाही असे काही संघटनांनी ठरवले होते. त्यासाठी संघटनांकडून आंदोलनेही करण्यात येत होती. परदेशात देशाच्या संस्कृतीची होऊ देणार नाही, असा पवित्रा काही संघटनांनी हाती घेऊन या नाटकाला परदेशात जाण्यास विरोध होऊ लागला होता.

जनसंघ, हिंदू महासभा, तसेच शिवसेनेकडून देखील या नाटकाला विरोध केला जात होता. त्यावेळी सगळे कलाकार बर्लिनला जाण्यासाठी पुण्याहून मुंबईला येणार होते आणि मुंबई विमानतळावरून बर्लिनला जाणार होते. त्यामुळे कलाकारांना मुंबई पुणे महामार्ग थांबवून त्यांना पुन्हा पुण्याला पाठवण्याचा विचार संघटनांनी केला होता.

अशावेळी हे नाटक बर्लिनला जाणार की नाही, असा प्रश्न सर्व कलाकारांना पडू लागला. त्यावेळी कलाकारांनी आपली अडचण शरद पवार यांच्यासमोर मांडली. तसेच हे नाटक बर्लिनला जाणे गरजेचे असल्याचे कलाकारांनी शरद पवारांना सांगितले.

शरद पवारांनी कलाकारांची अडचण समजून घेतली तसेच कुठल्याही परिस्थितीत हे नाटक बर्लिनला जाणार असल्याचे शरद पवारांनी ठरवले. यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता.

शरद पवारांना हे माहीत होते की, बसने जर पुण्याहून मुंबईला कलाकार गेले तर त्यांची नक्कीच अडवणूक होईल. त्यामुळे त्यांनी यात गनिमी कावा असा केला की, शरद पवारांनी बसने या नाटकातील टेक्निशियन असतील त्यांना मुंबईला पाठवले, मात्र कलाकारांना हे अजून पुण्यातच राहू दिले.

नाटाकतील मोजकी मंडळी होती जी नाटकातील महत्वाची माणसे होते त्यांच्यासाठी शरद पवारांनी एका वेगळ्या विमानाची व्यवस्था केली. या विमानाने सर्व कलाकारांना पुण्याहून थेट मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले आणि तिथून त्यांना बर्लिनला जाता आले.

घाशीराम कोटवालचा प्रयोग बर्लिनमध्ये झाला इतकेच नाहीतर पूर्ण युरोपात पूर्ण २५ प्रयोग घाशीरामच कोटवालचे झाले. तिथे या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. शरद पवारांच्या या गनिमी काव्यामुळे त्यांचे कलेवरचे प्रेम दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.