एकेकाळी पैसे नव्हते म्हणून शेणाच्या गौऱ्या थापत होता; आता कमवतोय करोडो रुपये; कसे ते वाचा..

0

प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय असते. मात्र यश त्यालाच मिळते जो नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतो, आजची ही गोष्ट अशाच एका तरुणाची आहे. ज्याने आपल्या परिस्थितीवर मात करत आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी केली आहे.

हरियाणामधल्या शौफी गावात राहणाऱ्या या तरुणाचे नाव गौरव राणा आहे. लहानपणी अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेणाऱ्या गौरवने एक ब्युटी स्टार्टअप कॅलेप्सो नावाची कंपनी सुरू केली असून या कंपनीमुळे गौरव आज कोट्यवधी रुपये कमवत आहे. इतकेच नाहीतर १०० लोकांना त्याने रोजगार पण दिला आहे.

गौरव लहान असताना कुटुंबाची परिस्थिती आर्थिक स्थिती खूप खराब होती. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना नोकरी करणे शक्य नव्हते. त्याच्या आजोबांची एक छोटीशी किराणा दुकान होती. पूर्ण कुटुंब त्याच किराणा दुकानावर चालत होते.

तसेच गौरव लहानपणापासूनच काम करत होता, शेण आणून गौऱ्या थापण्याचे काम पण गौरवने केले आहे. दहावीच्या शिक्षणानंतर त्याने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने एक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याने तिथून पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले.

२०११ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंदोरच्या एका कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. तेव्हा नोकरी सोबतच इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय पण केला पण यात त्याला १८ लाखांचे नुकसान झाले. पण त्याने खचून न जाता पुन्हा काहीतरी नवीन सुरू करण्याचे ठरवले.

त्याची आई एक ब्यूटीशियन असल्याने त्याला एक ब्युटी सलून टाकण्याची कल्पना सुचली. तेव्हा २०१५ मध्ये त्याने कॅलेप्सो ब्युटी सेंटर सुरू करण्याचे ठरवले. त्याला कॅलेप्सो मोठा ब्रँड बनवायचे होते, त्यामुळे त्यांनी मोठमोठ्या गुंतवणूकदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेक गुंतवणूकदारांनी नकार दिला.

पण गौरव प्रयत्न करत राहिला. खूप प्रयत्नानंतर त्याला यात यश मिळाले. ओयो रूमचे सीईओ रितेश अग्रवाल, ह्युज सिस्टिकचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद सूद आणि पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी गौरवच्या कंपनीत गुंतवणूक केली.

गौरव या व्यवसायासोबतच नोकरी करत होते पण रितेश अग्रवाल आणि विजय शेखर यांनी त्याला नोकरी करण्यापेक्षा पूर्ण लक्ष व्यवसायाकडे देण्यास सांगितले. तेव्हा गौरव यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष व्यवसायाकडे दिले त्यामुळे त्यांना कॅलेप्सो एक मोठा ब्रँड बनवता आला.

आज गौरव यांचा व्यवसाय भोपाळसोबतच इंदोरमध्ये पण चालत आहे. तसेच २०१९ मध्ये गौरव यांनी रेलून नावाची एक नवी सेवा ग्राहकांच्या भेटीला आणली. ज्यात ३० मिनिटात हेड मसाज, फूट रिलेक्सोलॉजी इत्यादी सेवा ग्राहकांना मिळते.

शून्यपासून सुरू केलेला व्यवसाय आज कोटींच्या घरात गेला आहे. गेल्यावर्षी या कंपनीची वार्षिक उलाढाल ७० कोटी एवढी झाली होती. येत्या वर्षात या कंपनीची उलाढाल आणखी वाढणार असल्याचे गौरव यांनी म्हटले आहे.

व्यवसाय करत असताना चढ उतार येत असतात, पण आपण नेहमीच त्या संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत दाखवली पाहिजे. आपण जर आपल्या व्यवसायात कष्ट घेत राहिलो आणि संघर्ष करत राहिलो तर नक्कीच आपल्याला आपले ध्येय गाठता येते.

Leave A Reply

Your email address will not be published.