KGF चा गरुडा कधीकाळी होता यशचा बॉडीगार्ड; रामचंद्र राजुला ‘असा’ मिळाला होता ‘गरुडा’चा रोल

0

साऊथचा सुपरस्टार यशचा KGF हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. आता सध्या KGF Chapter 2 चा टिझर रिलीज करण्यात आल्यानंतर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. KGF chapter 2 मध्ये संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

KGF Chapter 1 मध्ये अनेक कलाकार दिसले होते, त्यात श्रीनिधी शेट्टी, अनंत नाग, अर्चना जॉईस अशा कलाकार त्यात दिसून आले होते. पण सगळ्यात जास्त लक्ष गरुडाची भूमिका साकारणाऱ्या रामचंद्र राजू यांनी वेधून घेतले होते.

रामचंद्र यांनी सोन्याच्या खाणीचा मालक असणाऱ्या सुर्यवर्धनच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारली आहे. त्याच्या या खलनायिकेच्या भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गरुडाच्या भुमिकेनंतर रामचंद्र चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

रामचंद्रला ही भूमिका मिळण्यामागे पण एक गोष्ट आहे हे तुम्हाला माहितीये का? तुम्हाला असे सांगितले की KGF 1 च्या आधी रामचंद्राचा अभिनयाशी काहीच संबंध नव्हता, तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

रामचंद्र आधी यशचा बॉडीगार्ड होता. कित्येक वर्षांपासून तो यशचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. एकदा KGF चा दिग्दर्शक प्रशांत नीलने त्याला पाहिले आणि बोलावून घेतले पण पुढे जे घडले त्याने रामचंद्रला आश्चर्याचा धक्काच बसला.

प्रशांत नीलने त्याला पाहिले आणि त्याला गरुडाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. तेव्हा कधीही कॅमेऱ्यासमोर न येणारा रामचंद्र ऑडिशन देण्यासाठी तयारी करू लागला. त्याने आपल्या अभिनयावर काम केले तसेच शरीरावर आणखी मेहनत घेतली.

त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ अखेर त्याला मिळाले. जेव्हा त्याचे ऑडिशन घेतले तेव्हा तो लगेच गरुडाच्या भूमिकेसाठी सिलेक्ट झाला. त्यानंतर प्रशांत नीलने त्याला चित्रपटासाठी साइन केले अशाप्रकारे रामचंद्रला गरुडाची भूमिका मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.