नादच खुळा! दुबईची मोठ्या पगाराची नोकरी सोडून ‘हा’ तरुण उतरला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत

0

सध्या सगळीकडे ग्राम पंचायतीच्या निवडणूकीचे वारे वाहताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतीसाठी आता गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार आहे.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाकडून गावातील राजकारणात उतरून ग्रामविकास करण्याचा दावा करण्यात येत आहे. अशात कुही तालुक्यातील एक उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

तालुक्यातील उमरेड शहराच्या जवळ असलेल्या तारणा ग्रामपंचायतीत उमेदवार चक्क फॉरेन रिटर्न असल्याने सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे. या उमेदवाराचे नाव गणपत मारोती लुचे असे आहे.

गणपत लुचे हे चक्क दुबई व सौदी अरेबियातली नोकरी सोडून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उतरले आहे. गणपत हे तारणा येथील ३० वर्षीय अविवाहित तरुण आहे.

गणपत यांनी परदेशात सात वर्षे नोकरी केली आहे. विशेष म्हणजे तिथली लाख रुपयांची नोकरी सोडून गणपत निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.

५० वर्षांपासून प्रस्थापितांनी गावचा कारभार केला, मात्र गरीब आणि गरजू माणसाला शासनांच्या योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे. म्हणून मी गावातच राहून गावाची प्रगती करण्याचे ठरवले आहे, असे गणपत यांनी म्हटले आहे.

सध्या अनेक लोक शहरात जाताना दिसतात, शहरातील जीवनशैली या गोष्टींकडे आकर्षित होताना ते दिसतात. त्यामानाने खेड्याची स्थिती खूप बिकट आहे. असे असताना ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे, त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.