गरीब कुटुंबात जन्म घेऊन ‘मॅराडोना’ कसा बनला फुटबॉल विश्वातील महान खेळाडू?

0

 

बुधवारी फुटबॉल विश्वात मोठे नाव असलेले अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू डीएगो मॅराडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर मॅराडोना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. मॅराडोना यांच्या निधनाने संपूर्ण क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे.

१९८६ मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवले होते. मॅराडोना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय गोल केलेले आहे. त्यामुळे फुटबॉल सम्राट पेले यांच्यानंतर सर्वाधिक प्रसिद्धी डीएगो मॅराडोना यांनाच मिळाली होती.

डीएगो मॅराडोना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६० रोजी अर्जेंटिना येथे झाला होता. ते एका गरीब कुटुंबातून होते. त्यांना चार बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांनी लहानपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती.

८ वर्षाचे असताना मॅराडोना यांना घराजवळील स्थानिक क्लब एस्ट्रेला रोजा येथील टॅलेंट स्काऊटने खेळताना पाहिले. त्यामुळे त्यांना स्थानिक टीममध्ये घेण्यात आले. पूढे मॅराडोना यांनी आपल्या खेळाने ब्युनो आयर्सच्या अर्जेंटिनोस ज्युनिअर्स क्लबच्या संघात आपली जागा पक्की केली.

त्यांनी १९७६ मध्ये पहिल्यांदाच अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र १९७८ मध्ये झालेल्या विश्वचषकासाठी मॅराडोना यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर मॅराडोना यांनी १९७९ च्या फिफा वर्ल्ड युथचॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी बजावली होती. त्या स्पर्धेत अर्जेंटिनानेच विजय मिळवला होता.

डीएगो मॅराडोना या संघासाठी पाचवर्षे खेळले. त्यावेळी मॅराडोना यांनी १६७ सामन्यात ११५ गोल केले होते. १९८२ ला त्यांचे ट्रान्सफर बार्सिलोना क्लबला करण्यात आले.

१९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत मॅराडोना यांनी अर्जेंटिनाचे नेतृत्व करत त्यांना विजेतेपद मिळवून दिले होते. १९८६ ला त्यांना मानाचा गोल्डन बॉल आणि सिल्वर शूजचा पुरस्कार मिळाला होता. मॅराडोना यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत १६ सामन्यांचे नेतृत्व केलेले आहे.

मॅराडोना यांनी त्यांच्या खेळण्याच्या कारकिर्दीत ३१२ गोल केले आहेत. विश्वचषकातील २१ सामन्यात ८ गोल केले आणि तर ८ असिस्ट केले आहे.

फुटबॉल विश्वात काही विक्रम त्यांनी त्यांच्या नावे केले आहेत. त्यात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत ते दुसऱ्या स्थानावर आहे, तर निवृत्तीनंतर त्यांना फिफा शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.