७ एकर जमिनीत ७२ जातीच्या फणसाची झाडे लावणारा, महाराष्ट्राचा फणसकिंग माहितीये का?

0

शेती करताना जमिनीच्या आणि हवामान्याच्या अनुकूल पिके लावली जातात, जेणे करून पीक चांगले येईल आणि उपन्न चांगले निघेल, मात्र अनेक शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे हरिश्चंद्र देसाई.

कोकणातील शेती म्हटलं की डोळ्यासमोर भातशेती, आंबा, काजू, नारळ, यांसारखी उत्पन्न येतात. मात्र रत्नागिरीतील झापडे गावातील देसाई यांनी एक नवीनच प्रयोग केला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची संपूर्ण महाराष्ट्रात ‘फणसकिंग’ म्हणून अशी ओळख निर्माण केली आहे.

देसाई यांनी शिक्षण घेताना म्हणजेच पाचवी ते बी एससी होईपर्यंत चहा, फणस आणि आंबे विकून कुटुंब सांभाळले. देसाई यांचे सर्व काही ठरलेलेच असायचे, सकाळी उठायचं शेतात कामाला जायचे, दुपारी कॉलेज आणि संध्याकाळी पुन्हा शेत.

कोकणात असलेल्या लागवडींपेक्षा त्यांचे विचार जरा वेगळेच होते. त्यांना कॉलेजला असतानाच कोकण हा आंबा, काजू पेक्षा फणसामुळे ओळखला जावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शेती करायची तर फणसाचीच असे त्यांनी ठरवले.

देसाई यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शासकीय रुग्णालयात क्ष-किरण वैज्ञानिक म्हणून कामाला लागले. उरलेल्या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी झाडांच्या लागवडीला सुरुवात केली. देसाई यांनी पारंपारिक पिकांची नाही तर पर्यावरणपूरक पिकांची  लागवड केली.

त्यांनी ३१ वर्षे शासकीय सेवा करून २०१९ रोजी निवृत्त झाले. ते साध्य पूर्णपणे वेळ शेती करत असतात. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मिथिलेश देसाई हा देखील शेतीच करत असतो.

जगभरात फणसाच्या १२८ व्हरायटी आहे, त्यापैकी देसाई यांनी ७ एकर जमिनीत ७२ व्हरायटी आपल्या शेतात लावल्या आहे. मिथिलेशचे ध्येय १२८ पैकी १०० व्हरायटी आपल्या शेतात असाव्यात असे असे ध्येयावर मिथिलेशची वाटचाल देखील सुरू  आहे.

देसाई यांची तब्बल १२५० फणसाची झाडे आहे. इतक्या झाडांची लागवड करणारे ते महाराष्ट्रातील, गोव्यातील आणि कर्नाटकमधील एकमेव शेतकरी आहे. साधारणतः लोकांना फणसाच्या दोनच व्हरायटी माहीत आहे.

एक म्हणजे कापा आणि दुसरी म्हणजे बरका. पण देसाई यांनी विविध प्रकारच्या फणसांची लागवड त्यांनी केली आहे. सगळ्यांना फणसाच्या गाऱ्याचा रंग पिवळा असे माहीत असेल पण देसाई यांच्याकडे भगवा, पांढरा, लाल, पिंक, तसेच वर्षातून दोनदा येणारे फणस असे वेगवेगळे प्रकार आहे.

थंड हवेचे ठिकाण सोडल्यास बाकी सगळ्या ठिकाणी फणस येऊ शकते. सगळीकडे फणस येऊ शकतो, अनेक लोकांना असे वाटते की, फणस फक्त कोकणात येते तसेच नाही. देसाई यांनी अशा काही व्हरायटी निवडल्या आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा ठिकाणी येऊ शकतात, फणस हे एकमेव झाड असे आहे की जे ऑरगॅनिक आहे. सोबतच फणसाच्या झाडाचे आयुष्य १०० ते ३०० वर्षे इतके आहे, असे हरिश्चंद्र देसाई सांगतात.

तसेच लोकांनी किमान आत हळूहळू कोकण सोडता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फणसाची लागवड ट्रायल बेसिसवर केली पाहिजे. तसेच फणसाकडे फळ नाही तर अन्न म्हणून पाहिले पाहिजे कारण येत्या काळात ते ग्लोबल फ्रुट असणार आहे, असे मिथिलेश देसाईने म्हटले आहे.

मिथिलेश आणि त्याचे वडील देसाई यांनी जॅक फ्रुट रिसर्च सेंटर उभारायचे आहे. जेणे करून महाराष्ट्राला फणस लागवड करता येईल. तसेच ते स्वतःचे फूड प्रोसेसिंग प्लांट सुरू करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.