डॉ. रामचंद्र दांडेकर: ८७ वर्षांचे असूनही सायकलवर फिरून देताय कोरोना रुग्णांना मोफत उपचार

0

 

चंद्रपूर | देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अनेक लोकांना उपचार मिळवण्यास समस्या निर्माण होत आहे. अनेक लोकांचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यूदेखील होत आहे. अशात एखादा डॉक्टर जर रुग्णांच्या घरी जाऊन मोफत उपचार करत करतोय अस तुमच्यासमोर म्हटले तर तुम्हाला नक्कीच विश्वास बसणार नाही.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असेच एक जेष्ठ डॉक्टर आहे. त्यांचे नाव डॉ. रामचंद्र दांडेकर असे आहे. त्यांचे वय हे ८७ वर्षे असले तर अजूनही रुग्णांची मोफत सेवा करतात. एवढेच नाही तर त्यांनी कोरोनाच्या संकट काळात लोकांच्या घरोघरी जाऊन रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.

गेल्या ६० वर्षांपासून दांडेकर हे रुग्णांची मोफत सेवा करत आहे. आपल्या वयाची पर्वा न करता ते सायकलीवर ठिकठिकाणी फिरून रुग्णांना मोफत सेवा देत आहे. दांडेकर हे मुळात होमिओपॅथीचे डॉक्टर आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आहे. या संकट काळातही दांडेकर यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. खरे तर कोरोनाच्या संकट काळात अनेक डॉक्टर रुग्णांचा उपचार करण्यासाठी घाबरत होते. त्यांना हात लावण्यात त्यांची तपासणी करण्यात कचरत होते. अशात दांडेकर यांनी घरोघरी जाऊन रुग्णांचे मोफत उपचार केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावी ते राहायला आहे. तिथेच त्यांचा दवाखाना आहे. दवाखान्यात आलेल्या रुग्णांना तपासल्यानंतर ते लोकांचा उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात जात असतात.

वय वर्षे ८७ असले तरीही ते सायकलनेच आजू बाजूच्या गावात जात असतात. ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची भेट घेणे, त्यांच्यावर उपचार करणे, हे काम ते गेल्या ६० वर्षांपासून करत आहे. कोरोनाच्या संकटातदेखील त्यांनी आपले हे काम सोडले नाही.

माझे वय ८७ असले तरी अजूनही माझी ग्रामीण भागात जाऊन लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचा उपचार करून, त्यांना भेटून माझ्या मनाला समाधान भेटते, असे दांडेकर म्हणतात.

तसेच लोकांचे उपचार केल्यानंतर त्यांना फी देऊन वाटली किंवा त्यांनी फी दिली तर मी घेत असतो. मी कधीही माझ्या तोंडाने फी मागितली नाही, मी अनेक रुग्णांवर मोफत उपचार करतो, असेही दांडेकर यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील लोकांनाही त्यांचा चांगला अनुभव आला आहे. त्यामुळे अनेक लोक उपचारासाठी दांडेकर यांच्याकडेच येत असतात. तसेच ज्यांना दांडेकर यांच्याकडे यायला जमत नसेल तर ते रुग्ण डॉक्टर दांडेकर यांना फोन करतात. मग त्यांचा उपचार करण्यासाठी दांडेकर हे स्वतः त्यांच्या घरी उपचारासाठी जातात.

दांडेकर यांच्या मनात आले असते, तर ते कुठल्याही शहरात आरामात राहू शकत होते. तसेच त्यांच्या उपाचाराचा चांगला मोबदलाही त्यांना मिळू शकत होता. मात्र दांडेकर यांनी रुग्णांच्या सेवेत समाधान मानत रुग्णांची सेवा सुरू केली.

Leave A Reply

Your email address will not be published.