एस शंकर यांचा आतापर्यंत एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही; जाणून घ्या या मागचे खरे कारण…

0

 

फिल्म इंडस्ट्रीत काम करणे सिनेमे बनवणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. मात्र अनेक लोकांना सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागते. पण २५ वर्षे एखादा दिग्दर्शक सलग हिट चित्रपट देतोय असं म्हटलं तर नक्कीच यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा दिग्दर्शक आहे एस शंकर.

एस शंकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६३ मध्ये झाला होता. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली होती. तेव्हा त्यांना एक फिल्म बनवायची होती, ज्यात सुपरस्टार त्यांना नको होता, तसेच कुठलीही मोठ्या बजेट मध्ये ती नको होती, साधा ड्रामा, रोमँटिक अशी फिल्म एस शंकर यांना बनवायची होती.

शंकर २५ वर्षांचे असताना फिल्म इंडस्ट्रीत आले. सुरुवातीला त्यांनी दिग्दर्शक एस ए चंद्रशेखर यांच्या हाताखाली असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. १९८८ पासून पुढे पाच वर्षांपर्यंत ते असिस्टंट डायरेक्टरच होते. त्यांनी ‘जय शिव शंकर’, ‘इंसाफ की देवी’, ‘आझाद देश के गुलाम’, या फिल्ममध्ये त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

१९९३ मध्ये त्यांनी पहिली फिल्म बनवण्याचा विचार केला होता.  त्यांनी गंभीर विषय घेऊन एक महिलेच्या आयुष्यावर फिल्मची स्टोरी लिहली होती. त्यावर शंकर यांना फिल्म बनवायची होती. त्यांनी ही फिल्म बनवण्यासाठी अनेक निर्मात्यांच्या भेटी घेतल्या पण कोणीही शंकर यांच्यासोबत ही बनवण्यासाठी तयार नव्हते.

त्यावेळी साऊथमध्ये ऍक्शन फिल्मची क्रेझ होती. त्यामुळे त्यांनी आपले मन बदलले आणि ऍक्शन फिल्म बनवण्यास सुरुवात केली.  त्यांनी पहिली फिल्म जेटलमन नावाची बनवली होती. त्यामुळे त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली.

पुढे जाऊन त्यांनी १३ फिल्म बनवल्यात त्यामध्ये हमसे मुकाबला, हिंदुस्तानी, नायक, अपरिचित, शिवाजी, आय, रोबोट, रोबोट २.० अशाया चित्रपटांचे दिग्दर्शक शंकर यांनी केले आहे. यात ९ चित्रपटांचे निर्माते देखील ते होते. १९९३ पासून २०१८ पर्यंत त्यांनी एकही फ्लॉप फिल्म दिली नाही.

आतापर्यंत त्यांच्या चित्रपटात कधीही निर्मात्यांना आणि सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा तोटा झालेला नाही.  तसेच एस शंकर हे आता सर्वात जास्त पैसे घेणारे दिग्दर्शक आहे. तसेच रोबोट २.० ही सुद्धा भारतातील बिग बजेट फिल्म शंकर यांचीच आहे.

शंकर यांना आधीपासूनच प्रेक्षकांना काय हवे होते हे माहीत होते. त्यामुळे त्यांनी आधीपासून त्यांच्या प्रत्येक फिल्ममध्ये बॅकग्राऊंड डान्सर, इंग्लिश भाषा, अमेरिके राहणार नायक, अमेरिकेतून परतलेला नायक, विदेशी चेहऱ्याची गाण्यांमधली उपस्थिती, हे सर्व असायचे. तेव्हा सर्व प्रेक्षकांना हेच आवडत असत त्यामुळे त्यांचे चित्रपटदेखील तेवढेच हिट व्हायचे.

Leave A Reply

Your email address will not be published.