मिसळपाव विकणारा धर्मेश कसा झाला इंडियाचा सुपर डान्सर, वाचून डोळ्यात पाणी येईल…

0

परिस्थिती कशीही असली तरी एक दिवस नक्किच आपल्याला आपले ध्येय गाठता येते, फक्त आपण संघर्ष करत राहिला पाहिजे, असे अनेक लोकांच्या गोष्टींमधुन समोर आले आहे. आजची गोष्ट पण एका अशाच तरुणाची आहे.

ज्याने एकेकाळी मिसळपाव विकला पण आज त्याच्या कलेमुळे आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याने देशभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकेच काय तर एकेकाळी गरिबीत आयुष्य काढणारा हा तरुण आज करोडो रुपयांचा मालक आहे.

या तरुणाचे नाव धर्मेश यलांडे आहे. आज धर्मेश त्याच्या डान्सच्या कलेमुळे देशातील प्रत्येक घरात पोहचला आहे. त्याला धर्मेश सर म्हणुन ओळखले जाते. आज जरी त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धि असली तरी एकेकाळी त्याच्या आयुष्यात खुप संकटं होती.

धर्मेशचा जन्म गुजरातच्या एका गरिब कुटुंबात झाला होता. धर्मेशला लहानपणापासुनच डान्सची आवड होती, मात्र त्याच्या आईला त्याचे डान्स करणे आवडत नव्हते, त्यामुळे तो लपुन डान्स क्लासला जायचा आणि डान्स करायचा.

अनेकदा डान्समुळे धर्मेशला त्याच्या आईचा मार खावा लागायचा, पण धर्मेशच्या डान्सला त्याच्या वडिलांचा पुर्ण पाठिंबा होता. त्यामुळे आईपासुन लपवुन अनेकदा त्याचे वडिल त्याला पैसे देऊन डान्स क्लासला पाठवायचे.

त्याच्या वडिलांची चहाची टपरी होती. धर्मेशला आपल्या परिस्थितीची जाणिव होती, त्यामुळे तो आधीपासुनच काम करत होता. त्यामुळे तो एका ऑफिसमध्ये शिपाईचे काम करत होता.

पुढे त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या चहाच्या टपरीच्या शेजारीच मिसळपावचे स्टॉल टाकुन दिले. काही काळ मिसळपाव आणि चहा विकायचे काम पण त्याने केले होते.

चहाच्या टपरीवर काम करत असताना अनेकदा त्याच्या वडिलांचा हात भाजायचा. जेव्हा धर्मेश त्यांच्याकडे कपड्यांसाठी पैसे मागायला जायचा तेव्हा त्याचे वडिल त्याला पैसे द्यायचे पण वडिलांचे भाजलेले हात पाहुन धर्मेशला खुप वाईट वाटायचे आणि तोच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला.

त्यामुळे धर्मेशने लहान मुलांना डान्स शिकवण्यास सुरुवात केली. अशात त्याला डान्स इंडिया डान्समध्ये आपला डान्स दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. तिथुनच त्याच्या इंडस्ट्रिच्या प्रवासाला सुरुवात झाली.

धर्मेशने अनेक चित्रपट देखील केले आहे. तसेच तो ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या प्रसिद्ध शोमध्ये जज आहे. आज जरी त्याने इतकी प्रसिद्धी मिळवली असली तरी हे त्याचे एक दोन वर्षाचे नाही तर तब्बल १८ वर्षे केलेल्या मेहनतीचे फळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.