फक्त साडे पाचच महिन्याचा होता ‘या’ पंतप्रधानांचा कार्यकाळ तरी शेतकऱ्यांचा कर्ताधर्ता म्हणून बनवली होती ओळख

0

२३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान चरणसिंग यांच्या जन्मदिनानिमीत्त हा दिवस पुर्ण देशात राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणुन साजरा केला जातो.

माजी पंतप्रधान चरणसिंग यांचे नाव चौधरी चरणसिंग असे होते. ते भारताचे पाचवे पंतप्रधान होते. पण त्यांचा पंतप्रधानपदाचा काळ फक्त साडे पाच महिन्याचा काळ होता.

चरणसिंग २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० पर्यंत ते पंतप्रधान होते. त्यांनाच शेतकऱ्यांचा कर्ताधर्ता म्हणुन ओळखले जायचे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणुन साजरा केला जातो.

त्यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ मध्ये झाला होता. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील नुरपुर या गावातील एक मध्यमवर्गीय कुटूंबात ते राहत होते.

त्यांचे शिक्षण सरकारी शाळेतच झाले होते. शाळा दुसऱ्या गावात असल्यामुळे चरणसिंग तीन किलोमीटर पायीच शाळेत जायचे. पुढे त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. पदवीचे शिक्षण घेताना त्यांना रोज सायकलीने शहरात जावे लागायचे.

पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आग्राच्या विद्यापीठातुन पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या चरणसिंग यांनी गाजियाबादमधुन आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.

१९२९ मध्ये जेव्हा ते मेरठमध्ये आले, तिथूनच त्यांनी राजकारणात पदार्पण केले. उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणा कायद्याचे संपुर्ण श्रेय चरणसिंग यांनाच जाते. राजकारणात खुप कमी लोकनेते असतात, जे लोकांमध्ये राहुन काम करत असतात, त्याचपैकी चरणसिंग एक होते.

ते नेहमीच शेतकऱ्यांसाठी तत्पर असायचे. त्यामुळे त्यांनी लाखो शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला होता. चरणसिंग यांचे वैयक्तिक आयुष्य पण खुप साधे होते. मिळालेल्या मोकळ्या वेळेत ते वाचन आणि लेखन करायचे.

त्यांनी काही पुस्तके पण लिहली आहे. ज्यात जमीनदारी निर्मुलन, भारतातील गरिबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांची जमीन, असे अनेक पुस्तके त्यांनी लिहली आहे. १९ मे १९८७ रोजी त्यांचा मृत्यु झाला होता

Leave A Reply

Your email address will not be published.