‘या’ पठ्ठ्याने सुरू केलाय स्वतःचाच वडापावचा ब्रॅंड, आज आहेत तब्बल इतक्या शाखा

0

अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर सर्व म्हणजे वडापाव. पण आता वडापावचे क्रेज फक्त मुंबईतच नाही तर पुण्यातदेखील वाढले आहे. तसेच जशी पाच मैलांवर भाषा बदलते तसंच काहीसे वडपावचे पण आहे.

आता शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील दादा वाजे यांनी तर स्वतःचाच वडापावचा ब्रँड तयार केला आहे. झणझणीत आणि अस्सल ग्रामीण भागातील वडापाव अशी त्यांच्या या वडपावची ओळख आहे.

पुणे-नगर महामार्गाजवळ त्यांची ‘वाजे वडेवाले’ अशी शाखा आहे. त्यामुळे तिथले आणि तिथल्या जवळच्या परिसरातील लोक नेहमीच वाजे वडेवाले यांच्या दुकानात वडापाव खाण्यासाठी येत असतात. अनेकजण तिथे वडापाव खाऊन जातात, तर अनेक जण पार्सल पण घेऊन जातात.

दादा वाजे हे वाजेवाडी या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांना आपल्या परिस्थितीवर मात करायची होती, त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. कुठलाच खंबीर पाठिंबा नसतानाही त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी या व्यवसायाला मोठा ब्रँड बनवला.

सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भाग असल्याने तिथे ग्राहक मिळणे कठीण होते, पण त्यांनी आता आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे.

आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि गोड बोलीने दादा वाजे अनेक नवनवीन लोकांशी जोडले गेले आहे. त्यामुळे वाजे वडेवाले यांच्या कोणत्याही शाखेत ग्राहक येत असतात. विशेष म्हणजे वाजे वडेवाले यांच्या कोणत्याही शाखेत ग्राहकांना एकसारखीच चव मिळते.

वडापावसोबत लाल, हिरवी, पांढरी, अशा पाच प्रकारच्या चटण्या मिळत असल्याने या वडापावची चव सुद्धा निराळी लागते. तसेच तिथे गुळाचा चहा देखील मिळतो.

ग्राहकांच्या आग्रहामुळे त्यांनी पुढची शाखा ससणवाडी येथे उभारली होती. त्यानंतर लोकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे रांजणगावच्या गणपतीनगरीत आणखी एक शाखा त्यांनी उघडली आहे. खूप कमी वेळात त्यांनी हे यश गाठले आहे, त्यामुळे दादा वाजे अनेकांसाठी प्रेरणादायी बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.