सलाम! दोन्ही डोळे नसूनही ‘या’ मुलीने कळसुबाई शिखर केले सर

0

इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, असे म्हटले जाते. पण आता ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे पुर्णा तालुक्यातील लता पांचाळ या तरुणीने.

उद्धवराव आणि अरुणाबाई यांची मुलगी लताने नेत्रहीन असून कळसुबाई शिखर सर केले आहे. आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या शक्तीच्या जोरावर तिने ही कामगिरी केली आहे. पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे भागात लता राहते.

महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि चढाईला अत्यंत कठीण शिखर म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. कळसुबाई शिखर ५ हजार ४०० मीटर इतके उंच आहे. इतके असूनही नेत्रहीन लताने हे शिखर सर करून सर्वांसमोर एक आदर्श मांडला आहे. नववर्षाचे पूर्वसंध्येला तिने शिखर सर केले होते.

शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक युवतींना कळसुबाई शिखर सर करण्याची मोहीम आखून प्रोत्साहित केले जाते. यावर्षी प्रतिष्ठानकडून २० जिल्ह्यातील ७० दिव्यांग युवांना नेण्यात आले होते.

सर्वांना ३० डिसेंबरच्या मध्यरात्री सह्यादी पायथ्याशी असलेल्या जाहींगीरदारवाडी इथे एकत्र जमवण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी शिखर चढण्यासाठी सुरुवात केली होती. या मोहिमेत लता आपल्या काही मैत्रिणींसोबत सहभागी झाली होती.

नववर्षाच्या दिवशी पहाटे सर्वांनी कळसुबाई मंदिराचे दर्शन घेतले आणि सूर्याला नमस्कार करून परतीची वाट धरली. मोहिमेत सर्व सहभागी झालेल्या लोकांना शिवार्जुन प्रतिष्ठानकडून प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

लता ही लहानपणापासून नेत्रहीन आहे. तरी तिने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केले आहे. लताच्या या कामगिरीने लोकांसमोर एक आदर्श मांडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.