‘या’ माणसाच्या अंगात होते २४ लोक, पण एकात होता असा गुण त्यामुळेच सुटू शकला होता सगळ्यांपासून…

0

माणसाचा मेंदू आजपर्यंत कोणाला समजलेला नाही. माणसाच्या मेंदु बाबत अनेक शास्त्रज्ञ आपले संशोधन मांडत असतात. अजुन पण मेंदूवर शास्त्रज्ञ संशोधन करत आहे.

माणसाच्या मेंदूशी जुळलेले अनेक आजार आहे. असाच एक मानसिक आजार आहे तो म्हणजे मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तुम्ही चियान विक्रमचा अपरिचीत तर पाहिलाच असेल. त्याच्यात अंबि, रेमो आणि अपरिचीत अशा तीन वेगवेगळ्या व्यक्ती त्याच्यात होत्या.

असे आपण आजार चित्रपटात बघतो. पण अमेरिकेत एक अशी व्यक्ती आहे, ज्या वक्तीमध्ये २४ वेगवेगळे व्यक्ती होते. अमेरिकेच्या ओहिओ स्थित बिली मिलीगन असे त्या वक्तीचे नाव.

त्याचा जन्म १९५५ मध्ये झाला होता. त्याचे वडिल लहाणपणीच वारले होते. त्यामुळे बिलीची आई त्याला आणि त्याच्या इतर दोन भावंडांना घेऊन मियामी येथे आल्या. तिथे बिलीसह त्याच्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागायचा. त्यामुळे बिलीच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम व्हायचा.

त्यामुळे त्याच्या मानसिकतेत यांचे गंभीर परिणाम होत गेले, ते इतके भयंकर होते की, १९७७ मध्ये बिली चार बलात्कार प्रकरणी तुरुंगात गेला होता. विशेष म्हणजे चारही स्त्रीयांनी दिलेले जबाब वेगवेगळे होते.

एक महिलेने असे सांगितले की, तो एक लहान मुलगा होता. दुसरीने सांगितले तो एक जर्मन बोलणार माणूस होता. तर तिसरीने सांगितले तो एक लेस्बियन स्त्री होता.

पोलिसांना हे ऐकून विचित्र वाटले पण जेव्हा त्यांनी फिंगरप्रिंट घेतले तेव्हा त्यांना बिलीचेच फिंगरप्रिंट मिळाले. त्यामुळे त्यांनी त्याला तुरुंगाच्या आत टाकले. बिलीला याचे स्पष्टीकरण देता येत नव्हते. पोलिसांनी बिलीच्या इन्व्हेस्टीगेशनसाठी एक मानसशास्त्राची मदत घेतली.

त्यासाठी त्याला मेंटल हेल्थ सेंटरमध्ये टाकण्यात आले, तेव्हा डॉक्टरांना कळले की, बिलीच्या मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. त्यामुळे तो बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष सुटला आणि पुढे त्याला उपचारासाठी डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यात आले.

जेव्हा त्याच्यावर उपचार करण्यात आले तेव्हा त्याच्या अंगात असणाऱ्या २४ वेगवेगळ्या व्यक्ती समोर आल्या. त्यात चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे व्यक्ती होते. त्यात लहान मुले, उच्च शिक्षित, सराईत गुन्हेगार, लेस्बियन स्त्री, अशा वेगवेगळ्या लोकांची पर्सनॅलिटी त्याच्या अंगात होती.

१९८८ मध्ये डॉक्टरांनी तो पूर्णपणे या आजारातून बरं झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर तो व्यवसायिक म्हणून राहू लागला होता. २०१४ मध्ये त्याचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्याच्या आतल्या एक चांगल्या पर्सनॅलिटीनेच त्याची या आजारातून बाहेर येण्यास मदत केली होती

Leave A Reply

Your email address will not be published.