मुलांची भूक भागवण्यासाठी बनली रिक्षाचालक; आधी लोकांनी टोमणे मारले आता तेच लोक करतायत कौतुक

0

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, याचे उत्तम उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आले आहे. आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी एक महिला सहा वर्षांपासून रिक्षा चालवत आहे.

रोहतकमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव प्रमिला सैनी असे आहे. प्रमिला गेल्या सहा वर्षांपासून रिक्षा चालवत आहे. आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय तिने घेतला होता.

आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे प्रमिलाने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तिने हा निर्णय घेतला तर नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी तिला खूप टोमणे मारले पण तिने नेहमीच आपल्या मुलांचा चेहरा समोर ठेऊन काम केले.

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, आपल्या मुलांचे भविष्य चांगले घडवता यावे, यासाठी तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. पती, एक मुलगा आणि दोन मुली असे तिचे कुटुंब आहे.

रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रमिला रोहतक मधली पहिली रिक्षा चालक बनली आहे. जे लोक आधी तिला टोमणे मारायचे आज तेच लोक तिचे कौतुक करत आहे.

आज प्रमिला अनेक महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे प्रमिला आता अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

जेव्हा शहरात गुलाबी रिक्षांना सुरुवात करण्यात आली, तेव्हा प्रमिला पहिली गुलाबी रिक्षाचालक होती. आता शहरात जवळपास १५० रिक्षा आहे. दोन वर्षांपूर्वी प्रमिला आजारी पडल्याने तिने रिक्षा चालवण्याचे काम सोडून दिले आहे, पण अजूनही ती दुसऱ्या महिलांना प्रशिक्षण देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.