‘या’ चमत्कारामुळे ए आर रेहमानने स्विकारला होता मुस्लिम धर्म; नावाचा पण आहे अनोखा किस्सा

0

भारतीय सिनेमाचे प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांचा आज ५४ वा वाढदिवस. रेहमान यांच्या सांगीताने माणूस नेहमीच मंत्रमुग्ध होऊन जातो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी.

रेहमान नेहमीच आपल्या वेगळ्या संगीत शैलीमुळे चर्चेत राहिलेले आहे. त्यांचे फॅन फक्त भारतातच तर विदेशातदेखील त्यांच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेहमान यांना इंटरनॅशनल अवॉर्डसोबत जगप्रसिद्ध ऑस्कर अवॉर्डदेखील मिळाला आहे.

६ जानेवारी १९६६ मध्ये त्यांचा चेन्नईमध्ये जन्म झाला होता. ए आर रेहमान यांचे पूर्ण नाव अल्लाह रक्खा रेहमान असे आहे. त्यांचे खरे नाव दिलीप कुमार होते, पण ते नाव त्यांना आवडत नव्हते.

रेहमान यांना नेहमीच आपले नाव बदलायचे होते, पण ते नाव बदलण्याची संधी त्यांना मिळत नव्हती. संगीताची आवडत त्यांना त्यांच्या वडिलांमुळेच लागली होती, पण रेहमान ९ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.

वडिलांच्या निधनानंतर त्यांची परिस्थिती परिस्थिती खूप खराब झाली. यामुळे त्यांना आपल्या घरातले वाद्य पण विकावे लागले होते. पण रेहमान यांच्या आईचा सुफी संत पीर करीमुल्लाह यांच्यावर विश्वास होता.

त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर जवळपास १० वर्षानंतर ते कादरीसाहेब यांना भेटायला गेले होते. त्यावेळी रेहमान यांच्या आईने त्यांची खूप सेवा केली होती. त्यावेळी रेहमान यांना समजले की पूढे जार जायचे असेल तर एक मार्ग निवडावा लागले तो म्हणजे सुफी वादाचा.

तसेच संगीताची आवड तर त्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे त्यांनी सुफी मुस्लिम धर्म स्विकारला. एकदा रेहमान ज्योतिषीकडे गेले होते तेव्हा त्यांनी आपले नाव बदलात येईल का असे त्या ज्योतिषीला विचारले.

तेव्हा त्यांनी अब्दुल रहीम किंवा अब्दुल रेहमान असे ठेवा असे ज्योतिषाने सांगितले. रेहमान यांच्या आईला वाटले की अल्लाह रक्खादेखील त्यांच्या नावात असावे, हे नाव त्यांना खूप आवडले आणि त्यांनीआपले नाव ए आर रेहमान असे करून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.