नादच खुळा! २८ देशात ‘हा’ मराठमोळा तरुण गूळ विकून कमवतोय करोडो रुपये; जाणून घ्या कसं?

0

माणसामध्ये जर कष्ट घेण्याची ताकद असेल तर तो कुठलाही व्यवसाय यशस्वी करून दाखवू शकतो. आता याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. हे उदाहरण म्हणजे पुण्यातला अनिकेत खालकर हा तरुण.

पुण्यातल्या या मराठमोळ्या तरुण रेसिड्यू फ्री गुळाची निर्मिती करत आहे. आज त्याचा हा गूळ सातासमुद्रापार गेला असून जवळपास २८ देशांमध्ये या गुळाची विक्री होत आहे. त्यामुळे फक्त २६ वर्षे वय असताना ही कंपनी करोडोंची वार्षिक उलाढाल करत आहे. या व्यवसायात त्यांचे बंधू अमित खालकर हे देखील आहे.

मध्यमवर्गीय घरात जन्म घेणारे अनिकेतने वयाच्या १६ व्या वर्षी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पुणे जिल्ह्यात जवळे या गावात अनिकेत आणि अमित राहतात. अनिकेतने इंजिनिअरिंग केलेली आहे.

त्याला आधीपासूनच व्यवसायात रस होता. त्यामुळे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांना शेतीला पूरक असा व्यवसाय करायचा होता. कोणता व्यवसाय करायचा त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि गुळनिर्मिती करण्याचा व्यवसाय करायचे त्यांनी ठरवले.

त्यांच्या कंपनीचे नाव गौरी असे आहे. या व्यवसायत ते शेतकऱ्यांकडून ऊस घेतात, प्रति टननुसार ऊस रुपये घेऊन त्यांना पैसे दिले जातात, यावेळी त्यांनी ३००० हजार  रुपये टनने ऊस घेतला आहे. खालकर बंधू यांच्याकडे सहा गूळ प्रक्रियेचे प्लांट आहेत.

वीस हजार टन उसातून जवळपास अडीच हजार टन गुळाचे उत्पादन होते. त्यांनी तयार केलेला गूळ फक्त भारतातच नाही तर परदेशात पण विकला जातो. त्यांनी सर्व व्यापाऱ्यांची कार्यपद्धती समजून घेतल्याने आता २८ देशात त्यांच्या गुळाची विक्री होऊ लागली आहे.

तसेच एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता त्यांनी आयरिश कंपनीची सुरुवात केली आहे. ही कंपनी ड्रिंकिंग वॉटरबॉटल निर्मितीचे काम करते. तसेच गौरी ऑटोमोबाईल नावाने वाहनांचे शोरूमदेखील उघडले आहे.

एकदम सामान्य घरातून येणाऱ्या या तरुणांनी फक्त १० वर्षात इतके यश गाठले आहे. १० वर्षात अनिकेतने कोट्यवधीची कंपनी उभी केली आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात यश गाठल्याने अनेकांसाठी अनिकेत आता प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.