लॉकडाऊनमध्ये या पठ्ठ्याने कमावले १३ लाख; वाचा कसं…

0

लॉकडाऊन काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती आणखी खराब झालीये तर अनेकांना जेवणासाठीही पैसे उरलेले नाही. अशात लॉकडाऊनमध्ये काही लोकांनी आपल्या व्यवसायासाठी संधी देखील शोधली आहे.

काही लोकांनी या लॉकडाऊलाच एक संधी म्हणून बघितले आहे आणि लाखोंची कमाई केली आहे. ही गोष्ट अशा एका शेतकऱ्याची आहे ज्याने चक्क अंजीर विकून १३ लाख रुपये कमावले आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव समीर डोंबे आहे.

दौंड तालुक्यातील खोर गावात राहणारा समीर मॅकेनिक इंजिनिअर आहे. काहीतरी वेगळं करायच्या नादात त्याने शेती व्यवसायात अंजीराच्या शेतीचा प्रयोग करून पाहिला. त्याला या प्रयत्नात चांगलेच यश मिळाले.

समीरने स्वतःची विपणन व्यवस्था निर्माण केल्याने त्याला २० टन अंजिरांची सुरक्षित विक्री करता आली. त्यामुळे लॉकडाऊन काळात अंजीर विकून समीरने १३ लाख कमावले आहे.

समीरने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुण्यात नोकरी करत होता. पण त्याला काही तरी वेगळे करायचे होते, त्यामुळे त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. समीरच्या या निर्णयाचा सुरवातीला कुटुंबातील सदस्यांनी गावातील लोकांनी विरोध केला होता.

त्यांना असे वाटत होते की, समीरचा हा निर्णय चुकीचा आहे. शेती प्रत्येकजण करतो. समीरने विदेशात जाऊन सेटल व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण समीर शेती करण्याच्या निर्णयावर ठाम होता.

अडीच एकरावर असणारे अंजिरांची शेती त्यांनी पाच एकरांवर वाढवली. मार्केटमध्ये अंजीर वर्षातून २-४ महिनेच उपलब्ध असतात. मात्र कोणतीही गोष्ट मार्केटमध्ये ८ महिने तरी उपलब्ध असावी असे समीर यांचे मत होते.

आठ महिन्यानंतर जेव्हा समीर यांना अंजीरचे उत्पादन मिळाले तेव्हा त्यांनी याची विक्री थेट सुपर मार्केटला करण्यास सुरुवात केली. तसेच अंजिरांवर प्रक्रिया करून त्यांनी जॅम, जेली असे प्रॉडक्ट बनवण्यास सुरुवात केली. या गोष्टीचा समीर यांना चांगलाच फायदा झाला.

तसेच अंजिरांची पॅकिंग करून पुण्याच्या सोसायटीत विकला तसेच ज्या मॉलमध्ये फळभाज्यांचे शॉप सुरू होते, त्या ठिकाणीही त्यांनी आपला माल विकला.

अशाप्रकारे लॉकडाऊन काळात सुमारे २० टन अंजीर त्यांनी विकली याचा नफा त्यांना १३ लाख रुपये इतका झाला आहे. सुशिक्षित तरुण शेतीकडे वळले तर ते शेतीत वेगवेगळे प्रयोग करून करोडोंची उलाढाल करू शकतात, असे समीरने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.