या पठ्ठ्याने आतापर्यंत १० हजार हरणांचे जीव वाचवले आहेत, कसे ते वाचा…

0

 

माणूस जितका माणसावर प्रेम करतो तितकेच प्रेम त्याने एखाद्या प्राण्यावर केले तर तितकेच स्नेह त्याला परताव्यात मिळते असे म्हणतात. असे काहीसे आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळते. इथल्या एका माणसाने गेल्या तीस वर्षांपासून आपले पूर्ण जीवन इथल्या प्राण्यांना समर्पित केले आहे.

अनिल बिश्नोई असे या माणसाचे नाव आहे. अनिल गेल्या ३० वर्षांपासून हनुमानगड येथील प्राण्यांचे रक्षण करत आहे, त्यामुळे त्यांनादेखील इथल्या प्राण्यांकडून स्नेह मिळाले आहे.

अनिल यांना लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. १९९० मध्ये अनिल सुरतगडच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तेव्हा एका संमेलनात वन्य जीवांमधून विलुप्त होणारे प्राणी आणि जंगलतोड यावर चर्चा सुरू होती.

अनिल यांच्या मनावर या गोष्टीने मोठा प्रभाव टाकला. त्यांना बीएड करून शिक्षक बनायचे होते, मात्र त्यांनी वन्य प्राण्यांचे रक्षण करण्याचे ठरवले. त्यामुळे आणि यांनी बीए केल्यानंतर बीएड केले पण नोकरी नाही केली.

अनिल यांनी गावी जाऊन नोकरी करण्यास सुरुवात केली. तसेच ते आपले वन्य प्राण्यांच्या रक्षणामध्ये गुंतून गेले. त्यावेळी हरणांची शिकार मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांनी हरणांना वाचवण्यास सुरुवात केली. तसेच शिकऱ्यांच्या विरोधात एक मोहीम देखील सुरू केली.

अनिल यांना जेव्हा कधी पण हरणांची शिकार होणार असल्याचा अंदाज येत असायचा तेव्हा ते हरणांना वाचवण्यासाठी तिथे यायचे. सोबतच ते हरणांची शिकार करणाऱ्या शिकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करायचे.

अनिल यांची ओळख हळूहळू पर्यावरण कार्यकर्ता म्हणून होऊ लागली. त्यामुळे कुठे शिकार होणार असेल तर त्याची खबर त्यांना वेगवेगळ्या गावातुन मिळून जायची आणि त्यांना प्राण्यांना वाचवता यायचे. त्यामुळे आतापर्यंत अनिल यांनी जवळपास १० हजार हरणांना वाचवले आहे.

अनिल हे नेहमीच वन्यजीवांचे रक्षण करत असतात. इतकेच काय तर ते स्वतः वन्यजीवांचा उपचार देखील करतात. त्यांना जर कुठे जखमी हरण भेटले तर त्याचा उपचार देखील अनिल करतात. तसेच उन्हाळ्यात तिथल्या जंगलात पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यासाठी वन्य जीवांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेछोटे बांध देखील बांधले आहे.

एकेकाळी हरणांच्या संख्येत घट होताना दिसत होती. त्यात अनिल यांच्या या कामामुळे खूप मोठा बदलाव आला आहे. तसेच गावातल्या तलावांमधल्या कासवांना देखील काही लोक घेऊन जायचे मात्र अनिल यांनी लोकांना समजावल्याने ते प्रमाण देखील कमी झाले, तसेच विविध प्राण्यांचे यात साप, मोर अशा प्राण्यांचे रक्षण देखील अनिल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.