१०५ वर्षांच्या आजीला मिळणार पद्मश्री पुरस्कार; आजपर्यंतची कामगिरी ऐकून तुम्ही पण ठोकाल सलाम

0

 

केंद्र सरकारने नुकतीच पद्मश्री पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत तामिळनाडूतील पप्पामल या आजींचेही नाव आहे. त्यांचे वय १०५ असले तरी त्या अजूनही शेतात राबताना दिसून येत आहे.

या आजीचे पुर्ण नाव एम पप्पामल अलियास रंगम्मल असे आहे. त्या तामिळनाडूतील भवानी नदीच्या काठावर वसलेल्या थेकपट्टी गावात राहतात. त्यांची अडीच एकर शेती आहे. विशेष म्हणजे १०५ वर्षे वय असताना त्या आजी शेती करताना दिसून येतात.

आजी या शेतीत वेगवेगळ्या पीकांची लागवड करत असतात. या शेतात आजी तृणधान्ये, डाळी, भाजीपाला,फळे या सर्व गोष्टी त्या सेंद्रीय पद्धतीने पिकवतात. तामिळनाडूमध्ये या आजींना सेंद्रीयसाठी आदर्श मानतात.

तामिलनाडूच्या देवलापुरममध्ये १९१४ मध्ये पप्पामल आजींचा जन्म झाला होता. त्या लहान असातानाच त्यांच्या डोक्यावरचे आईवडीलांचे छत्र हरवले. त्यामुळे त्यांचा संभाल त्यांच्या आजीने केला. आजीचे एक किराणा मालाचे दुकान होते, जेव्हा आजींचे निधन झाले तेव्हा पप्पामल आजीने हे दुकान चालवण्यास सुरुवात केली.

तसेच त्यांना आधीपासूनच शेतीची प्रचंड आवड होती. सुरुवातीला त्यांच्याकडे शेती नव्हती पण त्यांना शेती करायची होती. त्यामुळे त्यांनी दुकानात हॉटेल टाकले. तसेच त्यातून मिळणाऱ्या पैसे त्यांनी बाजूला काढण्यास सुरुवात केली.

पैसे जमल्यानंतर त्यांनी दहा एकर जमीन विकत घेतली. रासायनिक शेती करण्यापेक्षा त्यांनी सेंद्रीय शेती करण्याचा निरणय घेतला. तसेच त्यांनी मका, वेगवेगळ्या डाळी, फळे, भाजीपाला, लागवडीसाठी सुरुवात केली. तसेच शेती करण्यासोबतच त्यांनी तामिळनाडू कृषी विद्यापीठातून शेतीचे अधिकृत शिक्षण घेतले.

दहा एकर शेतीतून त्यांनी अडीच एकर शेती काढून बाकीची शेती मुलीला दिली. पप्पामल आजी गेल्या ६० वर्षांपासून शेती करत आहे. त्या पंचायत सदस्यही झाल्या होत्या पण शेतीची ओढ असल्याने त्या पुन्हा शेतीत आल्या.

श्रम हीच आपली माझी ताकद आहे. दुपारी झोपायचे मला आवडत नाही, आजही शेतीत राबल्याशिवाय मला झोप येत नाही, असे पप्पामल आजींनी म्हटले आहे. आजींचे इतके वय असूनही त्या अजूनही शेती संबंधित असणाऱ्या कार्यक्रमात आवडीने जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.