बजरंगी चहावाला: ८ वर्षाच्या मुलाला बनायचंय आयएएस, स्वत: उचलतोय शिक्षणाचा खर्च

0

 

 

असे म्हणतात स्वप्न त्यांचीच पुर्ण होतात जे स्वप्न बघतात, आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या मुलाचे स्वप्न आणि त्यासाठी तो घेत असलेली मेहनत तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल.

ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या बजरंगी चहावाल्याची. बजरंगी हा फक्त १० वर्षांचा असून तो प्रयागराजच्या संगमाच्या ठिकाणी चहा विकतो. बजरंगीला आयएएस ऑफिसर बनायचे आहे, त्यामुळे तो आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: उचलण्यासाठी चहा विकून पैसे कमवत आहे.

चहा विकून मिळालेल्या पैशातूनच तो आपले पुस्तक विकत घेतो आणि चहाचे विकून झाल्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागतो. संगमाच्या किणाऱ्यावर त्यागी बाबाला बजरंगी मिळाला होता. त्यागी बाबानेच बजरंगीचे पालनपोषण केले आहे.

बाबाने त्याचे प्रत्येग गरजा पुर्ण केल्या तसेच त्याला योगचे शिक्षण आणि संस्कार दिले आहे. पण आता त्यागी बाबांची वय जास्त झाल्याने त्यांची काम कमी करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी बजरंगीला एक चहाची दुकान उघडून दिली आहे. ज्यामुळे शिक्षणाचा खर्च तो स्वत: उचलू शकेल.

बजरंगी राधा-रमण शाळेत चौथीत शिकतो. बजरंगीची त्याच्या अभ्यासाविषयीची जिद्द बघून एका माणसाने त्याला अभ्यास करण्यासाठी स्मार्टफोन सुद्धा दिला आहे. चहा विकून मिळालेल्या पैशांमधून तो पुस्तक विकत घेतो आणि अभ्यास करतो.

बजरंगी आपल्या शिक्षणासोबतच आपल्यावर असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहे, त्यासाठी तो चहा विकून मेहनत घेत आहे, त्यामुळे सगळीकडून त्याचे कौतूक होत आहे.

बजरंगीला भविष्यात आयएएस ऑफिसर बनायचे आहे. त्यासाठी तो खुप मेहनत घेत आहे, तसेच त्यासाठी तो खुप जिद्दीने अभ्यासही करत आहे. त्याची ही जिद्दी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.