आईसाठी उभी केली १२ हजार ५८० कोटी रुपयांची कंपनी एकदा वाचाच ‘या’ पठ्ठ्याची कहाणी

0

आई नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेत असते त्याला नीट जगता यावं, चांगलं राहता यावं यासाठी प्रयत्न करत असते. कधीही आपल्या मुलाला संकटाचा सामना करावा लागावा नाही यासाठी झगडत असते.

आईचे हे उपकार कधीच कोणताच मुलगा फेडु शकत नाही. अशात एक मुलगा आपल्या आईसाठी काय करु शकतो, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. एका मुलाने आपल्या आईच्या इच्छेखातीर तब्बल १२ हजार ५८० कोटींची कंपनी उभी केली आहे.

या मुलाचे नाव युता सुरुओका असे आहे. हा मुलगा सध्या जपानचा एक मोठा बिझनेसमॅन आहे. तसेच त्याच्या या यशामुळे युताचे नाव फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

२०१२ मध्ये युता आणि त्याची आई जपानच्या एका ग्रामीण भागात राहत होती. त्याची आई तेव्हा एक छोटेसे दुकान चालावायची. तिला हा व्यवसाय ऑनलाईन करायचा परंतु तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने तिला हा व्यवसाय ऑनलाईन करता येत नव्हता.

तिला इंटरनेटची पुरेशी माहिती नसल्याने तिला या गोष्टीची खंत वाटत होती. तिने आपली हि खंत तिचा मुलगा म्हणजेच युताकडे व्यक्त केली, युता तेव्हा २३ वर्षांचा होता.

तसेच युता तेव्हा क्राऊड फंडींग स्टार्टअपमध्ये इंटर्नशिप करत होता. त्यावेळी त्याला इंटरनेटचे चांगलेच ज्ञान अवगत होते. त्यामुळे त्याने आपल्या आईसाठी काही तरी करायचे ठरवले.

लहान व्यवसायिकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने आपली एक नवीन कंपनी सुरु केली आणि तिचे नाव ‘बेस’ असे ठेवले.

या कंपनीमुळेच युता आज एक यशस्वी बिझनेसमॅन झाला आहे. तसेच तो कंपनीमुळे कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. त्याच्या कंपनीमुळे लोकांना स्वता:चे ऑनलाईन दुकान उघडून व्यवसाय करण्यास मदत होत आहे.

तसेच युताने या कंपनीसोबतच एक ऑनलाईन शॉपिंग ऍपदेखील सुरु केले आहे. आज या ऍपचे ७० लाखांपेक्षा जास्त युजर्स आहे. कोरोना काळात पण त्याच्या कंपनीला चांगला व्यवसाय मिळाला आहे. त्याच्या यशामुळेच त्याला फोर्ब्स यादीत स्थान मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.